राष्ट्रीय एकतेसाठी ठाणेकर उत्स्फुर्त धावले; सर्वांनी घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 17:40 IST2019-10-31T17:34:22+5:302019-10-31T17:40:57+5:30
ठाणे जिल्हा प्रशासनाव्दारे हा राष्ट्रीय एकता दौडचे व राष्ट्रीय एकातेसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह सर्कल येथून सुमारे एक किमी. अंतरापर्यंत ही राष्ट्रीय एकता दौड करून पुन्हा सर्कलवर येऊनही दौड समाप्त करण्यात आली.

या दौडला ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.
ठाणे : देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याऱ्या ‘राष्ट्रीय एकता दौड’चे (रन फॉर युनिटी) आयोजन केले असता त्यास ठाणेकरांनी गुरूवारी सकाळी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ देखील घेतली.
ठाणे जिल्हा प्रशासनाव्दारे हा राष्ट्रीय एकता दौडचे व राष्ट्रीय एकातेसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह सर्कल येथून सुमारे एक किमी. अंतरापर्यंत ही राष्ट्रीय एकता दौड करून पुन्हा सर्कलवर येऊनही दौड समाप्त करण्यात आली. या सहभागी होणा-या ठाणेकरांसह अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या या दौडला ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश पालवे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे, तहसिलदार राजेंद्र चव्हाण, जिल्हा क्र ीडा अधिकारी स्नेहल साळुखे आदी उपस्थित होते.
या राष्ट्रीय एकता दौड प्रसंगी शिवाजी पाटील यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ यावेळी देण्यात आली . या प्रसंगी ‘राष्ट्रीय एकता,अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी मी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सत्य निष्ठापुर्वक संकल्प करीत आहे’. अशी प्रतिज्ञा यावेळी सर्वांनी केली. या दौडमध्ये मॅरोथॉन ग्रुप, एन,सी,सी विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, पोलीस आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.