शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे ठाणेकर राहिले उपाशी! ५०० हॉटेल व्यावसायिकांचा कारवाईविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:56 IST

महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला.

ठाणे - महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला. यामुळे हॉटेलवर पोटभरणाºया ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. आयुक्तांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे.अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु, नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल, बार, लाउंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर, शनिवारी अग्निशमन विभागाने शहरातील तब्बल १३ हॉटेल सील केले होते. टप्प्याटप्प्याने उर्वरित हॉटेलही सील केले जाणार आहेत.परंतु, आता शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाविरोधात असहकार पुकारला आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी अचानक ४ वाजल्यापासून त्यांनी बंद पुकारला. महाराष्टÑ अग्निशमन कायद्यांतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या अटींचे पालन केले आहे. तसेच बी फॉर्मदेखील भरून दिला आहे. असे असतानादेखील अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी काढल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानेच हा बंद पुकारल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशनने दिली. अग्निशमन विभागाच्या या जाचक अटींमुळे आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचेही मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले.हॉटेल, बार सील करण्याची कारवाई सुरूचमहापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने शनिवारी केली होती. त्यानंतर, सोमवारी पुन्हा शहरातील १३ आणि मंगळवारी १० हॉटेल, बार अग्निशमन दलाकडून सील करण्यात आले आहेत. त्यानुसार, तीन दिवसांत ३६ हॉटेल, बार, लाउंज सील केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.कम्पोडिंग चार्जेस भरण्यावरून सुरू आहे वादअग्निशमन दलामार्फत कोणत्याही प्रकारच्या नव्या अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत. परंतु, कम्पोडिंग चार्जेस आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह चार्जेस भरण्याला या हॉटेल व्यावसायिकांचा विरोध असल्यानेच ते रद्द करण्यासाठी हा बंद पुकारल्याचे बोलले जात आहे.आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी टाकलेल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वी ज्या अटीशर्ती मंजूर झाल्या, त्याच आजही आहेत. त्यामुळे नव्याने कोणत्याही अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत.- शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपाबुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमवेत दुपारी १२.३० वाजता चर्चा होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.- रत्नाकर शेट्टी, हॉटेल-बार असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणे