शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाडमध्ये खिंडार; जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 16:44 IST

मुरबाड तालुक्यात गोटीराम पवारांना मानणारा मोठा वर्ग असून, तो आता शिवसेनेच्या मागे आल्याने शिवसेनेची ताकद मजबूत झाली आहे. 

ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनाभवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रवेश देत `ज्या कारणासाठी आपण एकत्र येत आहोत, ते कारण पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. तर शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

या वेळी ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई, राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, माजी आमदार पांडूरंग बरोरा आदी उपस्थित होते. सुभाष पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दिपाली झुगरे, किसन गिरा, निखिल पांडूरंग बरोरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुरबाडची चार टर्म आमदारकी भूषविलेल्या गोटीराम पवार यांचे सुभाष हे पुत्र आहेत. सुभाष पवार यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात मोठे जाळे तयार केले आहे. गोटीराम पवार यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५० हजार मते मिळविली होती. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीतही मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मुरबाड तालुक्यातून त्यांनी आघाडी मिळाली होती.

मुरबाड तालुक्यात गोटीराम पवारांना मानणारा मोठा वर्ग असून, तो आता शिवसेनेच्या मागे आल्याने शिवसेनेची ताकद मजबूत झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आहे. त्यात सुभाष पवार यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी पवार यांनी मुरबाड पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. मुरबाड तालुक्यात सुभाषदादा पवार मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचे हजारो समर्थक आहेत. जनसेवा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात शैक्षणिक जाळे निर्माण करण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदे, प्रकाश पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रवेश : पवार

ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच शिवसेनेने ग्रामीण भागाच्या विकासाला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्य करताना शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची विकासाप्रती भूमिका जवळून पाहता आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असे सुभाष पवार यांनी स्पष्ट केले. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच अग्रक्रम दिला. शिवसेनेने कधीही पक्षभेद केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठाणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत शिवसेनेला आणखी मजबूत करण्यासाठी कार्य करणार आहोत. इतर पक्षात प्रवेश करताना त्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी असते. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताना शिवसैनिकांचा उत्साह पाहावयास मिळत असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस