ठाणे जिल्हा परिषदेचे कामकाज वागळे इस्टेटला भाड्याच्या इमारतीत सुरू

By सुरेश लोखंडे | Published: March 15, 2024 06:37 PM2024-03-15T18:37:07+5:302024-03-15T18:37:17+5:30

ठाणे : येथील जिल्हा परिषदेची मुख्य इमारत १९६५- ६६ साली बांधण्यात आली होती. मात्र ही इमारत अतिधोकादायक झाल्याने मार्च ...

Thane Zilla Parishad is functioning in the rented building of Wagle Estate | ठाणे जिल्हा परिषदेचे कामकाज वागळे इस्टेटला भाड्याच्या इमारतीत सुरू

ठाणे जिल्हा परिषदेचे कामकाज वागळे इस्टेटला भाड्याच्या इमारतीत सुरू

ठाणे : येथील जिल्हा परिषदेची मुख्य इमारत १९६५- ६६ साली बांधण्यात आली होती. मात्र ही इमारत अतिधोकादायक झाल्याने मार्च २०१९ मध्ये ती पाडण्यात आली. आता याच ठिकाणी नवी प्रशासकीय इमारत बाधंण्यात येणार आहे. त्यास अनुसरून ही जागा माेकळी करून देण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेचा संपूर्ण प्रशासकीय कामकाज भाड्याच्या इमारतीतून सुरू झाले आहे. तब्बल तीन वर्षांसाठी स्क्वेअर फिट होम्स, एस.जी. बर्वे रोड, जि. एस.टी. भवन समोर, वागळे इस्टेट, एम.आय.डी.सी, २२ नंबर सर्कल, ठाणे- (प) येथे भाडेतत्त्वावरील इमारतीत जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू झाले आहे.

उर्वरित म्हणजे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग आवारातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व बांधकाम विभाग आहे त्याच इमारत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधण्यात येणाऱ्या नवीन मुख्य इमारतीच्या प्रस्तावाला ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नवीन इमारतीमध्ये सर्व विभाग एकत्रित समन्वयाने काम करू शकणार आहेत.

Web Title: Thane Zilla Parishad is functioning in the rented building of Wagle Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे