शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ठाणे जिल्हा परिषदेत सत्ताबदलाचे वारे ! शिवसेना करणार भाजपशी युती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 1:12 AM

दीड वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर जिल्हा परिषदेत सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत.

 - सुरेश लोखंडेठाणे  - दीड वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर जिल्हा परिषदेत सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेतील राष्ट्रवादीला डच्चू देऊन शिवसेना भाजपशी युती करून जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तनाच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.राज्यात भाजप-शिवसेना युती असतानाही ठाणे जिल्हा परिषदेत ती झाली नाही. निवडणुकाही स्वबळावर लढलेल्या शिवसेनेने भाजपला चार हात लांब ठेवत राष्ट्रवादीला सोबत घेऊन जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली; मात्र लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेली अडवणूक शिवसेना-भाजपसाठी मोठीडोकेदुखी ठरली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला कोणत्याही सदस्याची तक्रार येऊ नये व त्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात निवडणुकीच्या कामात सहभाग घ्यावा, यासाठी आतापासून वातावरण निर्मिती करण्याची गरज लक्षात घेत, जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला सहभागी करून घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.लोकसभेच्या मतमोजणीनंतर, म्हणजे २३ मेनंतर या सत्ता बदलण्याच्या हालचाली उघडपणे होण्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे. काही ज्येष्ठ सदस्यांनीदेखील या वृत्तास दुजोरा दिला आहे.एवढेच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा एक लोकप्रतिनिधीदेखील शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेत शिवसेना भाजप युतीची सत्ता प्रस्थापीत करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपद देणार भाजपलाशिवसेनेचे २६ आणि राष्ट्रवादीचे दहा अशा ३६ सदस्यांच्या जोरावर जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु, आता लवकरच जिल्हा परिषद अल्पमतात आणून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुका लादल्या जाण्याची शक्यता आहे. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत शिवसेना स्वत:च्या २६ सदस्यांसह भाजपचे १५ आणि एक अपक्ष अशा ४२ सदस्यांची मोट बांधून युतीची सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे. अध्यक्षपदासह आताची सभापतीपदे शिवसेना आपल्याकडे कायम ठेवणार आहेत. राष्ट्रवादीकडील उपाध्यक्ष व विषय समितींची दोन सभापतींची पदे भाजपला देणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा