शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

ठाण्यातील तरुणाचा खून करून महिलेचे बंगलोरला पलायन

By जितेंद्र कालेकर | Updated: March 20, 2018 23:30 IST

अनैतिक संबंधातून ठाण्यातील एका तरुणाचा खून करुन बंगलोरला पसार झालेल्या महिलेला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देलग्नाला विरोध केल्यानेच टोकाचे पाऊलमैत्रितून जुळले अनैतिक संबंधकासारवडवली पोलिसांनी लावला छडा

जितेंद्र कालेकरठाणे : आधी प्रेमाच्या आणाभाका घेत विश्वासात घेऊनही ऐनवेळी लग्नाला नकार देणा-या कबिर लष्कर (२५) या तरुणाचा खून करून पसार झालेल्या क्षमाबेगम अन्वर लष्कर (२८) या विवाहितेला ठाणे पोलिसांनी अवघ्या २४ तासातच थेट बंगलोर येथून मंगळवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे कोणताही धागादोरा नसतांना यातील तिचा शोध घेण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे.घोडबंदर रोडवरील अन्वर लष्कर याच्या सायकलच्या दुकानात दुरुस्ती आणि देखभालीचे काम कबीर करीत होता. तिथे नोकरीला असल्यानेच त्याची आणि अन्वरची पत्नी क्षमाबेगम यांची ओळख झाली. याच ओळखीतून त्यांच्यात अनैतिक संबंधही निर्माण झाले. त्याने तिचा विश्वास संपादन करून लग्न करण्याची तयारीही दाखविली. त्यासाठी तू घर सोडून दे, घर सोडल्यानंतर आपण दोघेही लग्न करू, असे तिला त्याने अमिष दाखविले. प्रत्यक्षात ती त्याच्यासाठी घर सोडून आल्यानंतर मात्र त्याने लग्नाला नकार दिला. यातूनच त्यांच्यात १७ मार्च रोजी वाद झाला. याच वादातून तिने कबीरचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याच्या गुप्तांगावरही तीक्ष्ण हत्याराने वार केला. नंतर त्याच्या डोक्यावरही विटेने प्रहार करून तिथून पलायन केले. आपले बिंग फुटू नये म्हणून तिने थेट बंगलोरमधील आपले मूळ घर गाठले. दरम्यान, १९ मार्च रोजी दुपारी वामन तेलगावे यांचा भाडेकरू असलेल्या कबीरच्या घरातून दुर्गंधी आल्याने हा खुनाचा प्रकार उघड झाला. घटनास्थळी कोणताही दागादोरा नसतांना पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, निरीक्षक वैभव धुमाळ आणि नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने मंगळवारी थेट विमानाने बंगलोर गाठून क्षमा बेगम हिला तिच्या घरातून ताब्यात घेतले. तिला बुधवारी ठाण्यात आणले जाणार आहे. या खुनात तिने आणखी कोणाची मदत घेतली? खुनाचे आणखीही काही कारण आहे का? या सर्वच बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाMurderखून