ठाण्यात तरुणाला विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 02:55 IST2020-06-26T02:54:57+5:302020-06-26T02:55:08+5:30

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच यातील आकाश शाहू (२२, रा. किसननगर, ठाणे) याच्यासह दोघांना सोमवारी ताब्यात घेतल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी बुधवारी दिली.

In Thane, a young man was stripped and beaten; The two were arrested as soon as the video went viral | ठाण्यात तरुणाला विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच दोघांना अटक

ठाण्यात तरुणाला विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच दोघांना अटक

ठाणे : वागळे इस्टेट परिसरात दहशत माजवण्यासाठी सहा गुंडांनी १९ वर्षीय तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना किसननगर येथील भटवाडी भागात घडली. यावेळी त्याचा व्हिडिओदेखील बनविण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच यातील आकाश शाहू (२२, रा. किसननगर, ठाणे) याच्यासह दोघांना सोमवारी ताब्यात घेतल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी बुधवारी दिली. यातील अन्य चौघांचाही शोध घेण्यात येत आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ठाण्यातील किसननगर भागात अलिकडेच घडली. या तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला विवस्त्र करीत. त्याचा व्हिडिओ आकाश याच्यासह सहा जणांच्या टोळक्याने बनविला होता. तो व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला. त्याला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की, आठ दिवस तो घराच्या बाहेरही पडू शकला नाही. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. मात्र, या व्हिडिओच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेतला. त्याची चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
२० जून रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्याआधी १३ जून रोजी भटवाडी भागात ही घटना घडली. विकी भोसले या कुख्यात गुंडाची दहशत कायम राहण्यासाठी पूर्ववैमनस्यातून त्याच्या साथीदारांनी या तरुणाला बेदम मारहाण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विकीच्या विरोधात असलेल्या सागर रावलसोबत हा मारहाण झालेला तरुण असायचा. याच रागातून हा वचपा काढल्याचे बोलले जाते. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी २२ जून रोजी ताब्यात घेतले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.

Web Title: In Thane, a young man was stripped and beaten; The two were arrested as soon as the video went viral