शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ७११ सार्वजनिक तर ३० हजार ३०४ घरगुती श्रींच्या मूर्तींचे होणार विसर्जन, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्हीची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:44 IST

ड्रोन कॅमेऱ्यांसह सीसीटीव्हीद्वारे विसर्जन घाटांवरील अगदी बारीक सारीक हालचालींवर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्यासह वरीष्ठ अधिकारी हे थेट पोलीस नियंत्रण कक्षातून करडी नजर ठेवणार आहेत.

ठाणे, दि. 4 - ड्रोन कॅमेऱ्यांसह सीसीटीव्हीद्वारे विसर्जन घाटांवरील अगदी बारीक सारीक हालचालींवर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्यासह वरीष्ठ अधिकारी हे थेट पोलीस नियंत्रण कक्षातून करडी नजर ठेवणार आहेत. ११२ विसर्जन ठिकाणी ७११ सार्वजनिक आणि ३० हजारांहून अधिक घरगुती गणेश विसर्जन मिरवणूका सुरक्षितपणे पार पडण्यासाठी राज्य राखीव दलासह शीघ्र कृती दलाच्या तुकडयाही तैनात करण्यात आल्या आहेत.यंदा प्रथमच चोख आणि सुरळीतपणे विसर्जनाचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे शहर पोलीस विसर्जन घाटावरील सर्व हालचालींचे प्रक्षेपण ठाणे महापालिकेच्या सहकार्यातून उभारलेल्या सीसीटीव्हीद्वारे पाहणार आहेत. उपवन, रायलादेवी, मुंब्रा, कळवा, मासुंदा अशा मोक्याच्या ४० ते ५० ठिकाणी हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच विसर्जन मार्ग आणि विसर्जन घाट याठिकाणी द्रोण कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. नियंत्रण कक्ष आणि अधिकाºयांच्या मोबाईलमध्ये विशेष अ‍ॅपची सुविधा करण्यात आली असून त्याद्वारे शहरातील अगदी कोणत्याही ठिकाणावरुन या विसर्जन मिरवणूकांची इथ्यंभूत माहिती पोलीस अधिकाऱ्यांची हातात मिळणार आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच विसर्जन सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी वाहतूक मार्गांमध्येही विशेष बदल करण्यात आले आहेत.असा आहे पोलीस फौजफाटा संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील गणेश विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी ८ पोलीस उपायुक्त, १५ सहायक पोलीस आयुक्त, ११३ निरीक्षक, २९८ उपनिरीक्षक, ३२ महिला उपनिरीक्षक, तीन हजार ५०० कॉन्स्टेबल, ९०० महिला कॉन्स्टेबल, ५०० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या आणि एक शीघ्र कृती दलाची कंपनी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवPoliceपोलिस