शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा..."; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:35 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, अशी भूमिका मांडल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

-विशाल हळदे, ठाणेMNS Thane news: 'दुर्दैव आहे की आम्हाला मराठी माणसालाच मराठी व्याकरणाचं पुस्तक द्यावं लागत आहे. हे पुस्तक घ्या आणि इथून सुरूवात करू. होणार, करू असं चालणार नाही. राज ठाकरेंनी सांगितल्या प्रमाणे झालेच पाहिजे', असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक बँकेच्या अधिकाऱ्यांना दिला. तुम्ही दोन दिवस मागत आहात आम्ही पाच दिवस देतोय, पण, बदललं नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करू असे पदाधिकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना म्हणाले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी सक्तीचा मुद्दा गुढीपाडव्याच्या सभेत मांडला. त्यांनी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना संदर्भात कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून बँकांच्या शाखांना भेटी देऊन याबद्दल इशारा दिला जात आहे. 

दोन दिवस मागता आहात, पाच दिवस देतो पण... 

ठाणे शहरातील कर्नाटक बँकेच्या शाखेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भातील निवेदन दिले. 

वाचा >>राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे गेली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये; अमराठी ब्रँच मॅनेजरने...

बँकेचे नाव आणि कार्यालयात मराठीत माहिती लावण्यासाठी अधिकाऱ्याने दोन दिवस मागितले. यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले, 'तुम्ही दोन दिवस मागत आहात. आम्ही पाच दिवस देतोय, पण हे बदललं पाहिजे. होणार, करतो हे चालणार नाही.'

'राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे झाले पाहिजे'

'आम्ही आज हात जोडून आलोय, परत येताना आम्ही हात सोडून येऊ. त्यावेळी आम्हाला बोलायचं नाही. आमची तुमच्याकडे विनंती आहे की, राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे झालेच पाहिजे. होणार, करू, हे आम्ही काही ऐकणार नाही', असा इशारा मनसेच्या पदाधिकार्‍यांनी बँकेच्या अधिकाऱ्याला दिला. 

पोस्टाच्या कार्यालयातही आंदोलन

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील पोखरण २ येथील पोस्ट कार्यालयात आंदोलन केले. मनसेचे जनहित व निधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, असे टीशर्ट अधिकाऱ्यांना देत आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेbankबँकmarathiमराठीBanking Sectorबँकिंग क्षेत्र