लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. मात्र, या कामासाठी शनिवारी सकाळी ९ ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास ठाणे शहरातील अर्ध्या भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेशनगर, उदयनगर, रेतीबंदर, सम्राटनगर, नारायणनगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजयनगर परिसर, रघुकुल, पारसिकनगर, आतकोनेश्वरनगर परिसर, पौंड पाडा, आतकोनेश्वर, खारेगाव, कळवा, मनीषानगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी १ व २, आकाशगंगा, बाळकुम, राम मारुतीनगर, लोढा अमारा, कल्पतरू, ब्रह्मांड, रुतू सिटी, गोकुळनगर, आझादनगर, मसनवाडा, रुतू पार्क परिसर, लोकमान्यनगर, इंदिरानगर, सावरकरनगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रूपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर नं. ३ परिसर, काकडे चाळ, कांदबरी सोसायटी, लोकदर्शन सोसायटी, परेरानगर, सुदर्शन कॉलनी परिसर, आझादनगर, गोकुळनगर, जेलटाकी परिसर, पोलिस लाइन, खारकारआळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकरनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंतविहार, लोकपुरम, लोकउपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, वराडवाडी, शिवाईनगर, गावंडबाग, नीळकंठ, शास्त्रीनगर नं. १ व २, लक्ष्मीबाग, विहंगपार्क, मैत्रीपार्क, सिद्धांचल कॉम्प्लेक्स, वसंत विहार म्हाडा, वसंत विहार, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाउंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तकनगर परिसर, चिरागनगर, लोकमान्यनगर पाडा नं. १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवॉल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्यनगर पाडा नं. २, शास्त्रीनगर नं. २, आर्य क्रीडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, समतानगर, वर्तकनगर, भीमनगर परिसर, ज्ञानेश्वरनगर, महात्मा फुलेनगर, गंगाधरनगर, वैतीवाडी, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळीमंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकर रोड परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथनगर, डिसोझावाडी, कशीश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीरनगर, परबवाडी, इटर्निटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी, वागळे एमआयडीसी परिसर, केणीनगर, नेहरूनगर, किसननगर नं. २ इत्यादी भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
माजिवडा जंक्शन सेवा रस्ता बंद
संबंधित कामासाठी गोल्डन डाइज माजिवडा जंक्शन येथील सेवा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
५ दिवसांनी घेतले जाणारे शटडाऊन कायम
ठाण्यातील काही भागांना पाणी कपातीच्या संकटांना सामोरे जावे लागत असले तरी उन्हाळ्यात पाण्याचे चटके सहन करण्याची वेळ ठाणेकरांवर येणार नसल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. धरणात पुरेसा साठा असल्याने पाऊस पडेपर्यंत ठाण्याला पुरेल एवढा साठा असल्याचे प्रशासनाने सांगितले; परंतु तोपर्यंत १५ दिवसांनी घेतले जाणारे शटडाऊन कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Web Summary : Due to a major pipeline leak at Majiwada Junction, several areas of Thane will face a 24-hour water supply shutdown. Residents are urged to use water sparingly. The shutdown is necessary for urgent repairs.
Web Summary : माजिवडा जंक्शन पर पाइपलाइन में रिसाव के कारण, ठाणे के कई इलाकों में 24 घंटे जलापूर्ति बंद रहेगी। निवासियों से पानी का सावधानीपूर्वक उपयोग करने का आग्रह किया गया है। मरम्मत कार्य जरूरी है।