ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: गुन्हे शाखेची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: April 26, 2023 19:35 IST2023-04-26T19:35:35+5:302023-04-26T19:35:53+5:30

दीड कोटींची दोन हस्तीदंतही हस्तगत केली आहेत.

Thane Two ivory smugglers arrested Crime Branch action | ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे : हस्तीदंताची तस्करी करणाºया मोहम्मद सय्यद आणि रहीम खान या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून दीड कोटींची दोन हस्तीदंतही हस्तगत केली आहेत.

ठाण्यातील मुंबई नाशिक मार्गावरील सेवा रस्त्यावर आनंदनगर चेकनाका येथे तिघेजण हस्तीदंताची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच आधारे २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने सय्यद आणि खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हस्तीदंतासह एक कोटी ५० लाख ३६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून त्यांना २६ एप्रिल रोजी पहाटे अटक केली आहे.

Web Title: Thane Two ivory smugglers arrested Crime Branch action

टॅग्स :thaneठाणे