शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने चालकासह दोघांचा मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Updated: June 6, 2024 18:56 IST

याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे: मोटारसायकलीवरुन जाणाऱ्या मोहम्मद इस्लाम बंजारा (३४, रा. बगदाद मार्केट, कलीना रोड, कुर्ला, मुंबई) या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्यासह मागे बसलेल्या अब्दुल गफार नबी बंजारा (४९, रा. कुर्ला) या दोन्ही फेरीवाल्यांचा मृत्यू झाल्याची घटना माजीवडा गोल्डन डाईज नाका येथे घडली. याप्रकरणी चालक असलेल्या मोहमद बंजारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली.

ठाण्यातील घोडबंदरकडून नाशिककडे जाणाऱ्या उड्डाणपूलावरील वळणाजवळ गोल्डन डाईज नाका या मार्गावरुन मोहंमद इस्लाम आणि अब्दुल बंजारा हे दोघेजण एकाच मोटारसायकलीवरुन बाळकूम ते नाशिकच्या मार्गावर ५ जून रोजी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्याचवेळी मोटारसायकल चालविणाऱ्या अब्दुल याचा ताबा सुटल्याने त्यांची मोटारसायकल उड्डाण पूलाच्या बाजूला असलेल्या कठडयाला जोरदार धडकली. याच अपघातात अब्दुल आणि त्याच्या मागे असलेला मोहंमद या दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागला. यात दोघांनाही वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनीठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक संतोष पिंपळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातPoliceपोलिस