शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

ठाणे वाहतूक पोलिसांची ३७५ मद्यपी वाहनचालक आणि १८१ सहप्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 20:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधातील ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची कारवाई आता ...

ठळक मुद्दे थर्टी फस्टसाठीही कडेकोट बंदोबस्त ५५६ जणांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची वसूली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधातील ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची कारवाई आता तीव्र झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये ३७५ मद्यपी वाहनचालकांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाºया १८१ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. या ५५६ जणांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येकी दोन हजार रु पये दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी दिली.कोरोना संक्र मणाचा धोका टाळण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली जात नव्हती. मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची भीती असल्याने २५ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी ही कारवाई पुन्हा सुरू केली. वाहन चालकांची सुरक्षित पद्धतीने तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी पीपीई किटसह विशेष कार्यपद्धती निश्चित केली. यामध्ये श्वास विश्लेषकाचे नोजलही प्रत्येक वेळी बदलण्यात येते. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये ६०० पेक्षा जास्त मद्यपी चालकांवर कारवाई झाली. अशा मद्यपी चालकासोबत प्रवास करणे हा देखिल गुन्हा असून मंगळवारी रात्रीपासून अशा सहप्रवाशांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.मंगळवारी रात्री ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, मुंब्रा, कळवा, उल्हासनगर आदी ठिकाणी केलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान ८९ जण मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळले. त्यांच्यासोबत प्रवास करणाºया ४३ जणांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही अधिक तीव्र होणार असून कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.*कासरवडवलीमध्ये सर्वाधिक कारवाईठाणे आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या १८ युनिटपैकी कासरवडवलीच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये सर्वाधिक ५१ मद्यपी वाहनचालक आणि २८ सहप्रवासी आढळले. त्या खालोखाल वागळे इस्टेट, कापूरबावडी आणि भिवंडी या विभागांनी कारवाई केली. ठाणेनगरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ९ मद्यपी वाहनचालक आणि तीन सहप्रवाशांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस