Thane: अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश
By जितेंद्र कालेकर | Updated: June 9, 2023 20:44 IST2023-06-09T20:44:07+5:302023-06-09T20:44:28+5:30
Thane: आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच नातेवाईक ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया यांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेत जबर मारहाण केली होती.

Thane: अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश
- जितेंद्र कालेकर
ठाणे - आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच नातेवाईक ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया यांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेत जबर मारहाण केली होती. याच प्रकरणात रसिक, नितीन आणि अनिल या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणेन्यायालयाने फेटाळल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
या अपहरण आणि मारहाण प्रकरणी रसिक, नितीन आणि अनिल यांच्यासह पाच जणांविरुद्ध मारहाणीसह धमकी दिल्याबद्दल वर्तकनगर पोलीस ठाण्यात २५ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील तक्रारदार बिपीन यांना २२ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कॅडबरी कपंनीजवळील सायकल स्टॅन्ड येथून रसिक बोरीचा यांनी संगनमत करुन एका मोटारीमध्ये जबरदस्तीने बसवून येऊर येथील बंगल्यावर नेले होते.
त्यानंतर बिपीन यांचा शर्ट व पँट जबरदस्तीने काढून बोरीचा यांच्यासह पाच जणांनी शिवीगाळ करीत लाकडी बांबू तसेच लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचे तसेच ठार मारण्याची धमकी देऊन त्यांची मोटार स्वत:कडे ठेवून घेतल्याचे बिपीन यांनी आपल्य तक्रारीमध्ये म्हटले होते. यातील आरोपींचा शोध सुरु असतांनाच त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.