शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक विभागाच्या ताब्यातील मोटारसायकलीची ठाण्यातून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 20:24 IST

ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह प्रकरणात ठाण्याच्या वागळे इस्टेट वाहतूक उपशाखेने जप्त केलेली मोटारसायकलच पोलिसांच्या ताब्यातून चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनीच नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्दे ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह मोहीमेच्या वेळी जप्त केली होती मोटारसायकल वागळे इस्टेट विभागाची कारवाईजप्तीची मोटारसायकल गायब झाल्याने उडाली खळबळ

ठाणे: एरव्ही, घराच्या आवारात लावलेली मोटारसायकल चोरीस गेल्यानंतर दुचाकीचे मालक पोलिसांकडे तक्रार करतात. पण, वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केलेली मोटारसायकलच वागळे इस्टेट वाहतूक विभाग कार्यालय आवारातून चोरीस गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सोमवारी तक्रार दाखल केली आहे.ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वागळे इस्टेट उप विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या पथकाकडून नितीन कंपनीजवळ ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह विरुद्ध ९ मार्च रोजी कारवाई सुरु होती. त्यावेळी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास लोकमान्यनगर येथे राहणारा गणेश चव्हाण याला मद्यप्राशन करुन मोटारसायकल चालवितांना त्यांनी पकडले होते. त्यावेळी त्याची मोटारसायकल जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर तो गाडी सोडविण्यासाठी न्यायलयातही गेला नाही आणि वाहतूक विभागाकडेही त्याने संपर्क साधला नाही. दरम्यान, त्याची मोटारसायकल नितीन कंपनी येथील ब्रिजच्या खाली वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोरच लोखंडी साखळीला कुलूप लावून पोलिसांनी ठेवली होती. अगदी अलिकडेच पोलिसांच्या पाहणीमध्ये ती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा चव्हाणकडे संपर्क साधला. मात्र, गेले दीड महिना गावी असल्याचे त्याने सांगितले. आता जप्तीमधील मोटारसायकलच चोरीस गेल्याने पोलिसांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक कुंभार यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २७ मे रोजी चोरीची तक्रार दाखल केली आहे. आता मोटारसायकलची चोरी कोणी केली, याचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी