शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय ढोलकी स्पर्धेत ठाण्याचा तेजस मोरे ठरला द्वितीय पारितोषिकाचा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:00 IST

सांगली येथे पार पडलेल्या ढोलकी बहाद्दर तानाजी वाडकर स्मृती ढोलकी वादन राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याचा सुपूत्र आणि ठाणेकर रहिवासी बाल ढोलकीपटू व प्रख्यात ढोलकीवादक कृष्णाजी घोटकर यांचे शिष्य तेजस पुंडलिक मोरे हा दुसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

ठळक मुद्देतेजस मोरे याने आपल्या ढोलकीतील स्वरतरंगांनी रसिकांची मनं जिंकली. सांगली जिल्ह्यातील भावे नाट्यमंदिर येथे ढोलकीसम्राट पैगंबरवासी यासीन म्हाब्री यांचे शिष्य ढोलकी बहाद्दर तानाजी वाडेकर स्मृती राज्यस्तरीय खुली ढोलकीवादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी देखील तेजसच्या कलेचे कौतूक केले आहे.

ठाणे - सांगली येथे मंगळवारी (2 एप्रिल) पार पडलेल्या ढोलकी बहाद्दर तानाजी वाडकर स्मृती ढोलकी वादन राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याचा सुपूत्र आणि ठाणेकर रहिवासी बाल ढोलकीपटू व प्रख्यात ढोलकीवादक कृष्णाजी घोटकर यांचे शिष्य तेजस पुंडलिक मोरे हा दुसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. स्पर्धेत सुरुवातीपासूनच तेजस मोरे याने आपल्या ढोलकीतील स्वरतरंगांनी रसिकांची मनं जिंकली होती. तेजस याला स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. 

सांगली जिल्ह्यातील भावे नाट्यमंदिर येथे ढोलकीसम्राट पैगंबरवासी यासीन म्हाब्री यांचे शिष्य ढोलकी बहाद्दर तानाजी वाडेकर स्मृती राज्यस्तरीय खुली ढोलकीवादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक ढोलकीपटू देखील सहभागी झाले होते. ठाण्यात राहणारा सुधागड तालुक्याचा सुपूत्र व सुप्रसिध्द ढोलकीपटू कृष्णाजी घोटकर यांचा शिष्य बाल ढोलकीपटू तेजस मोरे याने सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकी झाली बोलकी’ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. तसेच ठाण्यातील दैनिक जनादेश गौरव पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापौर भजन स्पर्धेतही तेजस मोरे हा अव्वल ठरला होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी देखील तेजसच्या कलेचे खूप कौतूक केले आहे.

अवघ्या 13 व्या वर्षात ढोलकीवादनातील 12 प्रकार आत्मसाद करणार्‍या तेजस मोरे याने ठाणे, मुंबई, आळंदी, पंढरपूर येथील ढोलकी स्पर्धांमध्येही आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. ढोलकी सम्राट तानाजी वाडेकर यांचे चिरंजीव संदीप वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या ढोलकीवादन स्पर्धेत सुरुवातीपासूनच तेजस मोरे याने आपल्या ढोलकीतील स्वरतरंगांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. अंतिम फेरीत तेजस मोरे दुसर्‍या स्थानावर विजेता ठरला. यावेळी परिक्षक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध ढोलकीवादक नवीनभाई शर्मा व संजय साळुंके यांनी काम पहिले. यावेळी द्वितीय विजेता तेजस मोरे यास स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले आहे.  

टॅग्स :thaneठाणेSangliसांगली