ठाण्यात विद्यार्थिनीची छेड काढून मारहाण

By Admin | Updated: June 23, 2017 05:52 IST2017-06-23T05:52:35+5:302017-06-23T05:52:35+5:30

पोखरण रोडवरील एका विद्यार्थिनीची तीन भामट्यांनी छेडखानी करून तिला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोनवर राहणारी १७

Thane student beat up the rage | ठाण्यात विद्यार्थिनीची छेड काढून मारहाण

ठाण्यात विद्यार्थिनीची छेड काढून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोखरण रोडवरील एका विद्यार्थिनीची तीन भामट्यांनी छेडखानी करून तिला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोनवर राहणारी १७ वर्षांची विद्यार्थिनी बुधवारी सायंकाळी शिकवणीसाठी गेली होती. शिकवणी वर्ग आटोपून ती रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी परत जात असताना आॅशर रेसिडेन्सीजवळ तिघांनी तिची छेडखानी करण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीने आक्षेप घेतला असता त्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी दीपू नामक आरोपीसह अन्य दोघांविरूद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला.
छेडखानीच्या घटनेची चितळसर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना शोधण्यासाठी मोहीम सुरु केली. ही मुलगी आरोपींना ओळखत नाही आणि ती आरोपींचे फारसे वर्णनही पोलिसांना सांगू शकली नाही.
मात्र, पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात चौकशी केली असता, तीनपैकी एका आरोपीची निश्चित माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे नाव दीपू असून, दोन मित्रांसोबत त्याने विद्यार्थिनीची छेड काढली होती. त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना मिळाला असून, त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती चितळसर पोलिसानी दिली. त्याच्या अटकेनंतरच या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींची माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Thane student beat up the rage