शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिवसेनेचाच बोलबाला, आघाडीची वाट खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:05 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादित केला आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादित केला आहे. ठाणे विधानसभा क्षेत्रात विचारे यांच्या मतांमध्ये मागील लोकसभेच्या तुलनेत तब्बल ४० हजारांची वाढ झाल्याचे दिसून आले. तर, राष्टÑवादीच्या उमेदवाराच्या मतांमध्ये घट झाली आहे. विचारे यांना यंदा ठाणे विधानसभा क्षेत्रातून एक लाख ३० हजार ७६३ मते मिळाली आहेत. तर, राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांना या मतदारसंघातून ४७ हजार ६५५ मते मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतांचा फायदा युतीच्या उमेदवाराला निश्चित होणार असून आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, या बालेकिल्ल्यावर मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने कब्जा केला आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोनही पक्ष युतीत लढल्याने त्याचा फायदा विचारे यांना झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या १३ नगरसेवकांचे वर्चस्व आहे. तर, राष्टÑवादीचे अवघे चार नगरसेवक आहेत. त्यात काँग्रेसचा येथे सफाया झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेस असून नसल्यासारखीच परिस्थिती असल्याचे मतमोजणीनंतर दिसून आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी, काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांना मिळून या मतदारसंघातून ४८ हजार ५८४ मते मिळाली होती. आता लोकसभा निवडणुकीत त्यातही ९२९ मतांची घट झाल्याचे दिसून आले. परंतु, शिवसेनेच्या मतांमध्ये मात्र एक हजार ५२९ मतांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. या निवडणुकीत ठाणे विधानसभा क्षेत्रात सुरुवातीला भाजपच्या नगरसेवकांनी विचारे यांना विरोध केला होता. परंतु, त्यानंतर त्यांचा हा विरोध मावळला आणि विचारे यांना या मतदारसंघातून निर्णायक मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघातून शिवसेना आणि भाजपने संघटितपणे काम केल्याचे दिसून आले. त्यामुळे हा संघटनात्मक आणि त्यातून आखलेल्या रणनीतीचा हा विजय असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे राष्टÑवादी आधीच या मतदारसंघात कमकुवत असल्याचे दिसत होते. परंतु, मेट्रो, नवीन ठाणे स्टेशन, कचºयाचा मुद्दा आदींसह इतर स्थानिक मुद्यांना हात घालतानाच शिक्षणाच्या मुद्यालाही राष्टÑवादीने हात घातला.>शिवसेनेने मारली जोरदार मुसंडीदुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ४,८८४ मते मिळाली. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम या निवडणुकीत दिसून आला नाही.परंतु, ज्या पद्धतीने शिवसेनेने या मतदारसंघात मुसंडी मारली, त्यानुसार त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसणार असून काँग्रेस, राष्टÑवादीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, हे नक्की.