शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:30 IST

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकविले आहे. स्पर्धेसाठी नव्हे तर स्वत:चे शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामाची गरज असल्याचे डॉ. राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देपाच किलो मीटर चालण्याची स्पर्धावरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पर्धेत मारली बाजीमहासंचालकांच्या हस्ते झाला गौरव

ठाणे: नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेतील चालण्याच्या स्पर्धेत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी कांस्य पदक पटकविले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते त्यांना हे पदक देण्यात आले. आरोग्य हीच संपत्ती असून व्यायामासाठी नियमित वेळ काढला पाहिजे, असा सल्ला त्यांनी पोलिसांना दिला आहे.या स्पर्धेत राज्यभरातील पोलीस अधीक्षक, उपायुक्त तसेच यावरील दर्जाच्या पोलीस अधिकाºयांनी सहभाग नोंदवला होता. १६ ते १८ जानेवारी २०१९ रोजी या क्रीडा स्पर्धा नागपूर येथे पार पडल्या. यामध्ये १७ जानेवारी रोजी झालेल्या पाच किलो मीटरच्या चालण्याच्या स्पर्धेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी सुवर्णपदक पटकविले. औरंगाबाद रेल्वेचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी रौप्य तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी कांस्य पदक पटकविले. ४९ वर्षीय डॉ. राठोड यांनी अनेक तरुण आयपीएस तसेच पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या नव्या अधिकाºयांनाही मागे टाकल्याने त्यांचे अनेक अधिका-यांनी विशेष अभिनंदन केले. ठाण्यात नियमित कॅडबरी जंक्शन ते वसंत विहार आणि हिनंदानी मेडोज ते येऊर रस्ता असा दहा किलो मीटर पायी चालणे आणि धावण्याचा व्यायाम करीत असल्याचे ते सांगतात. पैठण येथे (२००० मध्ये ) उपअधीक्षक म्हणून असतांना त्यांनी पायी चालण्याच्या व्यायामाची स्वत:ला सवय लावली ती आजही कायम आहे. केवळ एखाद्या स्पर्धेसाठी नव्हे तर स्वत:चे शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आपण टीव्ही, व्हॉटसअ‍ॅप आणि गप्पा मारण्यासाठी जसा वेळ काढतो, तसा तो नियमित व्यायामासाठीही पोलिसांसह सर्वांनीच काढावा, असा आवर्जून सल्लाही डॉ. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिला.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र