शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:14 IST

छानछौकीसाठी दुचाकी चोरुन त्याच दुचाकीवरुन मोबाईलची जबरी चोरी करणा-या एका दुकलीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. लाखाची दुचाकी अवघ्या काही हजारांमध्ये हे टोळके विक्री करीत होते.

ठळक मुद्देचोरीच्या गाडी विक्रीतून अमली पदार्थांची खरेदी१५ मोटारसायकली आणि ११ मोबाईल हस्तगतमोठी टोळी असल्याची शक्यता

ठाणे: मीरा भार्इंदर परिसरात मोटारसायकल आणि मोबाईलची जबरी चोरी करणा-या शुभम सिंग (२०,रा. काशीनगर, भार्इंदर पूर्व) याच्यासह एक अल्पवयीन मुलगा अशा दोघांना ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सिंग याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून १५ मोटारसायकली आणि ११ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.ठाणे ग्रामीण भागातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी आदेश दिले होते. याच संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक एस. एस. करांडे , अभिजित टेलर, जमादार अनिल वेळे, हवालदार विजय ढेमरे, चंद्रकांत पोशिरकर, मच्छिंद्र पंडीत, अर्जून जाधव, पोलीस नाईक अशोक पाटील, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, सचिन सावंत, प्रदीप टक्के तसेच राजेश श्रीवास्तव, सतिश जगताप आणि अतुल केंद्रेयांच्या पथकाने खबरी आणि सीसीटीव्हीच्या आधारे ३१ जानेवारी रोजी सिंग याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याच्याकडील दुचाकी ही त्याने मीरारोड शांतीपार्क येथून साथीदाराच्या मदतीने चोरल्याची कबूली दिली. अधिक चौकशीत त्याने मीरा भार्इंदर आणि परिसरातून चोरी केलेल्या १५ विविध मोटारसायकलींची त्याने माहिती दिल्यानंतर त्याही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. सिंग याच्या साथीदारांचा एम-२३ नावाची टोळी असून चोरलेल्या दुचाकींवर त्यांनी तसे स्टीकरही लावले होते. चोरलेल्या मोटारसायकलींवरुनच त्यांनी ११ मोबाईल जबरीने हिसकावले. तेही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या आणखी साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली...........................लाखाची दुचाकी अवघ्या पाच हजारांमध्येही टोळी लाखांच्या दुचाकीची चोरी केल्यानंतर तिची अवघ्या पाच हजारांमध्ये विक्री करीत होती. या पाच हजारांमध्ये मौज मजा तसेच मादक पदार्थांसाठीही ते उडवत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.

टॅग्स :thaneठाणेRobberyदरोडाCrimeगुन्हा