शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर राज्यात पहिले, तर देशात दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 02:48 IST

ठाण्यानंतर केडीएमसी अर्थात कल्याण-डोंबिवली दुस-या आणि नवी मुंबई राज्यात तिस-या क्रमांकावर आहे. राजधानी मुंबई राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.

ठाणे : ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८९ टक्क्यांवर आले असून राज्याचे हे प्रमाण ७१ टक्के आहे. यामुळे रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर हे राज्यात पहिल्या, तर देशात दिल्लीनंतर दुसºया क्रमांकावर आले आहे. सध्या ठाण्यात २० हजार ९८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही १८८५ एवढी आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांवर आले आहे. ठाण्यानंतर केडीएमसी अर्थात कल्याण-डोंबिवली दुस-या आणि नवी मुंबई राज्यात तिस-या क्रमांकावर आहे. राजधानी मुंबई राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.ठाणे शहरात मार्च महिन्यापासूनच कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत होती. त्यानंतर मे, जूनमध्येही रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. परंतु, या काळातही ठाणे महापालिकेनेही दोन वेळा लॉकडाऊन जाहीर केल्याने प्रशासनावर विरोधकांनी टीका केली होती. परंतु, आता याचे सकारात्मक परिणाम दिसत असून, शहरात बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिका हद्दीत आजपर्यंत २३ हजार ७३२ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारपर्यंत यातील २० हजार ९८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.>हे उपाय आले कामीठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिकेने केलेल्या महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोविड केअर सेंटर हे १०२४ खाटांचे रुग्णालयही ठाणेकरांसाठी फायदेशीर ठरले आहे.मुंब्रा, वागळे, लोकमान्यनगर आदींसह इतर भागांत राबविलेल्या पॅटर्नमुळे झोपडपट्टीतील कोरोना रोखण्यात यश आले आहे. देशातील इतर शहरांचा विचार केला किंवा राज्यातील इतर शहरांतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहिल्यास देशात दिल्लीचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के आहे. यामुळे ठाणे पॅटर्न हा राज्य आणि देशाला आदर्श ठरणार आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे ठाणे शहराने कोरोनावर यशस्वी मात करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, शिक्षक आदींसह इतर कर्मचाºयांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच कोरोना रोखण्यात यश आले आहे.- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस