Thane: मनोरुग्ण इसमाने घुसून केली बसची तोडफोड

By अजित मांडके | Updated: July 19, 2023 12:07 IST2023-07-19T12:07:14+5:302023-07-19T12:07:25+5:30

Thane: बस रोडलगत पार्क करून बसची साफसफाई करत असताना, बसच्या दुसऱ्या बाजूचा खुला असलेल्या दरवाजाने एक मनोरुग्ण व्यक्ती बसमध्ये घुसून बसच्या काचांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड नंबर २ या परिसरात घडली.

Thane: Psychopath Isma broke into the bus and vandalized it | Thane: मनोरुग्ण इसमाने घुसून केली बसची तोडफोड

Thane: मनोरुग्ण इसमाने घुसून केली बसची तोडफोड

- अजित मांडके
ठाणे - बस रोडलगत पार्क करून बसची साफसफाई करत असताना, बसच्या दुसऱ्या बाजूचा खुला असलेल्या दरवाजाने एक मनोरुग्ण व्यक्ती बसमध्ये घुसून बसच्या काचांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड नंबर २ या परिसरात घडली. त्या मनोरुग्ण व्यक्तीला बसमधून सुखरूप बाहेर काढून चितळसर-मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

बस चालक छोटेलाल थाटेर हा नेहमीच बसची साफसफाई करताना भिवंडी येथील ४० वर्षीय राजेश कुमार नामक व्यक्ती बसमध्ये शिरला आणि बसची तोडफोड केली. तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याची बाब पुढे आले आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर-मानपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली

Web Title: Thane: Psychopath Isma broke into the bus and vandalized it

टॅग्स :thaneठाणे