शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

ठाणे तलावांची महती सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:43 PM

जपानमध्ये तलाव परिषद; जलवैज्ञानिक साळसकरांचा सहभाग

ठाणे : ठाणे शहराची ओळख ही तलावांचे शहर म्हणून आहे. आता या तलावांची संख्या कमी झाली असली, तरी पालिकेच्या माध्यमातून या तलावांचे संवर्धन करण्याचे काम सुरूआहे. जगाच्या पटलावर थोड्याच शहरांवर निसर्गाची कृपा राहिलेली असताना, ठाण्यातील तलावांची महती सातासमुद्रापार जाणार आहे.ठाण्यात राहणारे तलावांचे अभ्यासक, जलतज्ज्ञ डॉ. प्रमोद साळसकर यांना जपान येथे होणाऱ्या सतराव्या जागतिक तलाव परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून बोलावण्यात आले आहे. देशभरातून एकूण आठ जण या परिषदेला जाणार आहेत. त्यामध्ये ठाण्यात राहणाºया साळसकर यांना हा मान मिळाला आहे.जलसंवर्धनाबाबत आता जगभरात प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांत जलजागृतीबाबत सजगता दाखवली जात आहे. तलाव, नदी इतकेच काय, समुद्राचे पाणीदेखील पिण्याजोगे करता येईल, यासाठी जलवैज्ञानिक काम करत आहेत. त्यापैकी एक ठाण्यातील डॉ. प्रमोद साळसकर हे जलतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा पाण्याच्या गुणवत्तेबाबत गाढ अभ्यास आहे. ठाणे आणि मुंबईमधील तलावांच्या संवर्धनासाठी सतत शासकीय आणि जागतिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. या कामाची दखल घेऊन जपानने त्यांना आॅक्टोबर २०१८ मध्ये होणाºया सतराव्या जागतिक तलाव परिषदेला हजर राहून भूमिका मांडण्याची विनंती केली आहे. १३ ते १९ आॅक्टोबर यादरम्यान जपानमधील सुकूबा येथील इबाराकी या ठिकाणी ही परिषद होणार असून त्या परिषदेला अमेरिका, जर्मनी, चीन, फ्रान्स, इंग्लंड, कोरिया अशा विविध देशांचे जलवैज्ञानिक हजर राहणार आहेत. जपानच्या माध्यमातून दर दोन वर्षांनी जगभरात विविध ठिकाणी ही परिषद होते.

टॅग्स :thaneठाणेJapanजपान