शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Thane Politics: व्याज-दंड माफीवरून सेना, राष्ट्रवादीत श्रेयवाद, ठाण्यातील म्हाडाच्या ११० सोसायट्यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 10:59 IST

Thane Politics: सावरकरनगरमध्ये म्हाडाच्या ११० सोसायट्या असून त्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या कामावरूनच शिवसेना - राष्ट्रवादीत पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

ठाणे  : सावरकरनगरमध्ये म्हाडाच्या ११० सोसायट्या असून त्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या कामावरूनच शिवसेना - राष्ट्रवादीत पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. हा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. तर हा निर्णय आमच्यामुळेच झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

‘नाच ना जाने अंगण तेढा’ याप्रमाणे  राष्ट्रवादीचे काम, श्रेय राष्ट्रवादीचे; मात्र लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग बारटक्के यांच्याकडून केले जात असल्याची टीका ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी केली.  नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमित सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे. यापूर्वी असे दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती; परंतु नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसऱ्याचे श्रेय घेण्याची संस्कृती वाढीस लागली आहे. 

काम दुसऱ्याचे आणि बॅनर स्वत:चा लावायचा, असे प्रकार ते करीत आहेत. ते कलियुगातील नारद आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. म्हाडाच्या ११० सोसायट्यांचा प्रश्न कोणी मार्गी लावण्यासाठी कितीवेळा बारटक्के म्हाडा कार्यालयात गेले, किती अधिकाऱ्यांशी बोलले, ही प्रक्रिया कशी होती, किती वेळा नागरिकांच्या बैठका घेतल्या, याचे पुरावे त्यांनी सादर केले तर आपण राजकारण सोडू. तसेच पुरावे सादर करता आले नाही तर बारटक्के यांनी जाहीर माफीनाम्याचे पोस्टर्स लावावेत, असे आव्हान सरैय्या यांनी दिले आहे.

परांजपे यांनी निवडून यावे मग बोलावेयाबाबत बोलताना बारटक्के म्हणाले की, यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या स्तरावर व्याज आणि दंड माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.  पाच वर्षे गायब असलेले सरैय्या आता निवडणुकांच्या तोंडावर या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परांजपे यांनी निवडणूक लढवून निवडून यावे आणि मग बोलावे असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :mhadaम्हाडाthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस