शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दिल्ली येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:07 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकातील महिला पोलिसांनी आस्थेने चौकशी करुन कल्याणच्या मुरबाड रोडवरील नवज्योत ट्रस्ट या संस्थेतील १६ वर्षीय मुलीला तिच्या दिल्ली येथील आई वडीलांच्या नुकतेच ताब्यात दिले आहे. ठाणे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल दिल्ली पोलिसांनीही कौतुक केले आहे.

ठळक मुद्देआई, वडील आणि सामाजिक संस्थेच्या दिले ताब्यातक्षुल्लक कारणावरून सोडले होते घर महिला पोलिसांनी केली आस्थेने चौकशी

ठाणे : दिल्लीतील मनियारी नरेला भागातील राजीव कॉलनी येथून वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. या मुलीची ओळख पटवल्यानंतर तिला मंगळवारी आईवडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील हरविलेल्या तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलीकडेच दिले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, उपनिरीक्षक कैलास सोनवणे तसेच महिला पोलीस शिपाई माधुरी जाधव, तेजश्री शेळके, वंदना पोटफोडे आणि नीलम पाचपुते यांच्या पथकाकडून अशा बेपत्ता मुलामुलींचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यावेळी माधुरी जाधव आणि तेजश्री शेळके यांनी कल्याणच्या मुरबाड रोडवरील नवज्योत ट्रस्ट या संस्थेत जाऊन संचालकांकडे याबाबत चौकशी केली. दिल्ली येथील १६ वर्षीय मुलगी या संस्थेत दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. सुरुवातीला या मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने कोणतीही माहिती दिली नाही. महिला पोलिसांनी तिची दोन, तीनवेळा भेट घेऊन तिला विश्वासात घेतले. तेव्हा जुलै २०१८ मध्ये दिल्लीच्या राजीव कॉलनी येथून घरातील कोणालाही काहीएक न सांगता निघून आल्याची कबुली तिने दिली. तिला सामाजिक कार्यकर्त्याने उल्हासनगरच्या बालकल्याण समितीच्या आदेशाने भिवंडीतील सनराइज हॅप्पीहोम बालसुधारगृहात जुलै २०१८ मध्ये दाखल केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून तिला मुरबाडच्या नवज्योत ट्रस्ट येथे ठेवण्यात आले होते. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता, ९ जुलै २०१८ रोजी नरेला (दिल्ली) पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. तिच्या आईवडिलांशीही संपर्क साधून ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, १७ सप्टेंबर २०१९ रोजी उल्हासनगर बालकल्याण समितीच्या आदेशाने तिला तिचे आईवडील तसेच सामाजिक संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. आईवडील आपल्यापेक्षा धाकट्या भावाला जास्त जीव लावतात, असा समज झाल्याने तिने घरातून निघून जाण्याचे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले. या तपासात महिला शिपाई माधुरी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. गोपनीयतेच्या कारणास्तव या मुलीचे नाव जाहीर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस