शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

ठाणे पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यात ७५ टक्के गुण; फक्त ३९ सायबर गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 07:57 IST

११,९६७ पैकी ८,९३० गुन्ह्यांची केली उकल, गंभीर गुन्ह्यांचा शंभर टक्के छडा

लोकमत न्यूज नेटवर्क , ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयात जानेवारी ते डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, विनयभंग, बलात्कार, अमली पदार्थांची विक्री आदींसह ११,९६७ गुन्हे दाखल झाले. त्यातील ८,९३० गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, हे प्रमाण ७५ टक्के असल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, तडीपारी, परकीय नागरिक कारवाई, हुंडाबळी आदी गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण १०० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिस स्टेशन स्तरावर दामिनी पथक, पोलिस काका, पोलिस दीदी पथक स्थापन केले आहे. शाळेतील अल्पवयीन मुला, मुलींची सुरक्षेसाठी वर्षभरात १,२८५ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन १,२६२ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. त्यात ८४,३१३ विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग नोंदविला.  

सीसीटीव्ही व्यवस्था 

पोलिस आयुक्तालयात १,९९७ ठिकाणी ६,०५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून, त्यासाठी ५७० कोटी ३० लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. 

७१४ पैकी फक्त ३९ सायबर गुन्ह्यांची उकल

मागील वर्षभरात ७१४ सायबर गुन्ह्यांची आयुक्तालयात नोंद झाली असून, त्यातील ३९ गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम ही १६२ कोटी एवढी आहे, तर सायबर पोलिस स्टेशनकडून ३ कोटींपेक्षा जास्त सायबर फसवणुकीसंदर्भात गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे. दाखल गुन्ह्यात टास्क फ्रॉड ५८, शेअर ट्रेडिंग ११६, कुरिअर २६, डिजिटल अरेस्ट ५० व इतर ४६९ गुन्ह्यांचा समावेश आहे. 

ज्येष्ठांसाठी सहायता कक्ष

ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायता कक्ष सुरू असून, त्यात १९९ बैठका घेण्यात आल्या असून, ७,१४३ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलिस मित्र ही संकल्पना सुरू असून, त्याचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. 

आपले ठाणे सुरक्षित ठाणे 

ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण २,२५० संवेदनशील आणि महत्त्वाची ठिकाणे निवडण्यात आली. या ठिकाणी चेन स्नॅचिंग, महिलांची छेडछाड आणि इतर गुन्हे होऊ नयेत, यासाठी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे ॲप तयार केले आहे. या योजनेंतर्गत एकूण ७,८७७ पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांची नोंदणी करण्यात आली.

नवी पाच पोलिस स्टेशन

पोलिस आयुक्तालयात आणखी पाच पोलिस ठाणे कार्यरत असून, त्यात भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, शिळ-डायघर आदी ठिकाणांचा समावेश असणार आहे. याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला, तसेच वाढीव मनुष्यबळ मिळावे, यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.

लोकसंख्या वाढत आहे, तसेच मागील काही वर्षांत गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. मात्र, गुन्ह्यांच्या संख्येपेक्षा उकल किती प्रमाणात होते, ते महत्त्वाचे आहे. त्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.- आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे.

टॅग्स :Policeपोलिस