शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज

By जितेंद्र कालेकर | Updated: January 18, 2024 20:04 IST

शहरातील धार्मिक स्थळांवरही पोलिसांची करडी नजर

ठाणे: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी ठाणे शहर पोलिसही सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने शहरात महत्वाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त सुरू केला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांची यादीही तयार केली जात असून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. शहरातील संवेदशील आणि मोठया धार्मिक स्थळांवर पोलिसांची २४ तास नजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन, मराठा आरक्षण आणि राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांनी विशेष गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे. संवेदनशील ठिकाणांसह इतर महत्वाचे नाके, चौक, बाजारपेठा, गदीर्ची ठिकाणे, हॉटेल तसेच लॉज आदी भागात १७ जानेवारीपासूनच नाकाबंदी, तपासणी सुरू केली आहे. रेकॉर्डवरील आरोपींचाही धांडोळा घेतला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यासाठी ठाण्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जमा होऊ शकतात, अशी शक्यता पोलिसांच्या गोपनीय शाखेने वर्तविली आहे. आगामी निवडणूकांपूवीर्च पोलिसांकडून गुन्हे प्रतिबंधक कारवायांनाही सुरुवात केली आहे. ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यात संबंधित पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन रात्री, पहाटे आणि सकाळच्या वेळेत गस्त सुरू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्व खबरदारी घेतली जात आहे. बाहेरुन येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नाकाबंदी केली जात आहे. सीसीटिव्ही मार्फत तसेच साध्या वेशातील पोलिसांकडून संवेदनशील भागात नजर ठेवली जात आहे. ठाण्यातील सर्वच पोलिस उपायुक्तांच्या बैठका बोलावून पाेलिस आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावाही घेतला आहे. त्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा रूट मार्च देखील काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.संपूर्ण आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग सुरू केली आहे. पोलिस दल सर्तक असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.

दत्तात्रय कराळे, सह पोलिस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस