शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

चरस तस्करांबाबत ठाणे पोलिसांनी केली जम्मू काश्मीर पोलिसांकडे चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:12 PM

ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने मुंब्य्रातून तीन चरस तस्कारांना जेरबंद केल्यानंतर त्यांची माहिती मिळविण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता जम्मू काश्मीर पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे.

ठळक मुद्देदहशतवाद्यांच्या संबंधाचीही चाचपणी३१ लाखांचे चरस मुंब्य्रातून केले होते हस्तगतठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

ठाणे: थेट जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खानसह तिघांना मुंब्य्रातून अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का? त्यांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? यादृष्टीनेही आता ठाणे पोलिसांनी जम्मू काश्मीर पोलिसांकडे माहिती मागविली आहे.साजीद, अब्दुल गुजली आणि मोहम्मद मकबूल भट या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने १ मार्च रोजी अटक केली. त्यांच्याकडून ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस तसेच एक लाख ७३० रुपयांची रोकड असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे इतक्या मोठया प्रमाणात चरस सारखा अंमली पदार्थ मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आणखी साथीदारांची नावे, ते कोणत्या टोळीशी संबंधित आहेत? त्यांचा आणि दहशतवाद्यांशीही कितपत संबंध आहे? त्यांना आर्थिक रसद पुरविणारे किंवा त्यांचा म्होरक्या कोण आहे? याची चौकशी या तिघांकडे सध्या करण्यात येत आहे. शिवाय, जम्मू काश्मीर पोलिसांचीही त्याबाबत मदत घेण्यात आहेत. ठाणे पोलीस आयुक्तांमार्फत याबाबतचे पत्र जम्मू काश्मीर पोलिसांना पाठविण्यात आले आहे. या पत्रातून ठाणे पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात १ मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्हयाचा तपशील दिला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांकडून त्यावर अधिक तपशीलवार माहिती मिळाल्यास अटक केलेल्या या तिघांकडून आणखी माहिती मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुलनेने जम्मू काश्मीरमधून आणलेला हा चरस उच्च प्रतीचा मानला जातो. त्यामुळे त्याची आंतरराष्टÑीय बाजारपेठेत किंमतही किलोमागे दोन कोटींच्या घरात आहे. त्यमुळे मुंब्य्रातही त्यांचे नेमके कोण कोण गिºहाईक आहेत? त्यांची ही तस्करी कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेत सुरु असते? याचाही तपास सुरु असल्याची माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस