शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी दुर्मिळ खवले मांजरची तस्करी ठाण्यात उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 18:05 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेला, अतिशय दुर्मिळ खवले मांजरची तस्करी करणार्‍या रायगड जिल्ह्यातील दोघांना ठाण्यातील वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी अटक केली. या प्राण्याची ते ४0 लाख रुपयात विक्री करणार होते.

ठळक मुद्दे४0 लाख रुपयात करणार होते विक्रीरायगड जिल्ह्यातील दोघांना अटकदेखभालीसाठी वनविभागाच्या हवाली

ठाणे : अतिशय दुर्मिळ खवले मांजरची तस्करी करणार्‍या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ५ ने शुक्रवारी अटक केली. नामशेष होत चाललेल्या या सस्तन प्राण्याची त्यांच्या तावडीतून पोलिसांची सुटका केली.मुंग्या आणि अळ्या खाऊन जगणार्‍या खवले मांजरच्या तस्करीची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना दिल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर वागळे इस्टेटमधील श्रीनगर येथील आयप्पा मंदिराजवळ पोलिसांनी एक वाहन अडवले. या वाहनाची तपासणी सुरू असताना गाडीच्या मागच्या बाजुला एका पिंजर्‍यामध्ये खवले मांजर पोलिसांना आढळले. पोलिसांनी याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील अशोक जयराम जाधव आणि पोलादपूर येथील संतोष मुळजी बुटाला यांना अटक केली.खवले मांजर हा संरक्षित वन्यजीव असल्याने श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९, ५0 आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईची प्रक्रिया आटोपल्यानंतर देखभालीसाठी खवले मांजर वनविभागाच्या हवाली करण्यात आले. आरोपी हे मांजर ४0 लाख रुपयात विकणार होते. त्यासाठी ते ग्राहकाच्या शोधात होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केले.कोकणातून पकडल्याची शक्यताखवले मांजर हा एक दुर्मिळ, महागडा आणि प्रचंड मागणी असलेला प्राणी आहे. त्याचा वापर औषध तसेच अंमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. त्याच्या मांसालाही मोठी मागणी आहे. त्याचे खवले घरात शोभेसाठी वापरले जातात. आरोपी अशोक जाधव याने हे खवले मांजर स्वत: शिकार करून कोकणातून आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमि तपासली जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसwildlifeवन्यजीव