लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : डायघर येथील एका दुकानातून ५५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरणा-या अब्दुल सलाम खान (२५, रा. दिवा रोड, ठाणे) आणि मुन्वर खान (३१, रा. ठाकूरपाडा, ठाणे) दोघांना डायघर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील २२ हजारांच्या या तांब्याच्या तारा आणि लोखंडही हस्तगत करण्यात आले आहे.शीळफाटा-महापे रोडवरील ठाकूरपाडा येथील रहिवासी असलेले अब्दुल अन्सारी यांच्या पनवेल रोडवरील उत्तरशीव येथील स्क्रॅप मर्चंट या भंगाराच्या दुकानातून २४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते २९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान २० हजारांच्या ५५ किलो तांब्याच्या तारांचे तुकडे तसेच १०० किलो वजनाचे लोखंडी पाइपाचे दोन हजारांचे तुकडे असा २२ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर आणि लॉक उचकटून हा ऐवज चोरला होता. याप्रकरणी अन्सारी यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डायघर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्येच अब्दुल आणि मुन्वर या दोन्ही चोरट्यांना अटक केली. या दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यात तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:25 IST
एका दुकानातून ५५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरणा-या अब्दुल सलाम खान (२५, रा. दिवा रोड, ठाणे) आणि मुन्वर खान (३१, रा. ठाकूरपाडा, ठाणे) दोघांना डायघर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. या दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यात तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्देतीन दिवसांची पोलीस कोठडीडायघर पोलिसांची कामगिरीभंगाराच्या दुकानात केली होती चोरी