Thane: उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा हिस्सा कोसळला शेजारील घरावर, घराचे नुकसान
By सदानंद नाईक | Updated: March 22, 2024 20:56 IST2024-03-22T20:56:33+5:302024-03-22T20:56:52+5:30
Ulhasnagar News: कॅम्प नं-३, शांतिनगर गावड़े शाळेच्या बाजूच्या धोकादायक सिमरन इमारतीचा काही शेजारील घरावर पडून घराचे नुकसान झाले. इमारत पाडण्याचे काम सुरू असताना, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडला असून घर बंद असल्याने, जीवितहानी झाली नाही.

Thane: उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा हिस्सा कोसळला शेजारील घरावर, घराचे नुकसान
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतिनगर गावड़े शाळेच्या बाजूच्या धोकादायक सिमरन इमारतीचा काही शेजारील घरावर पडून घराचे नुकसान झाले. इमारत पाडण्याचे काम सुरू असताना, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडला असून घर बंद असल्याने, जीवितहानी झाली नाही.
उल्हासनगरात असंख्य धोकादायक इमारती उभ्या असून अश्या इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी होत आहे. शांतीनगर गावडे शाळेजवळ सिमरन नावाची धोकादायक इमारत उभी असून ती पाडण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान इमारतीचा काही भाग शेजारील दोन घर व एका इमारतीच्या वॉचरुमवर पडल्याने, त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने घरे बंद असल्याने जीवितहानी टळली आहे. शहरातील धोकादायक इमारतीचा हिस्सा शेजारील घरावर पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाल्यावर, महापालिका पथकाने घटनास्थळी भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. धोकादायक इमारत पाडताना सुरक्षेची उपाययोजना केली नसल्याची टीका होत असून याप्रकरणी महापालिका अधिक तपास करीत आहेत