शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघरसह रायगडच्या जिल्हा रुग्णालयांचा आहारपुरवठा करणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:57 IST

जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आहारपुरवठा करणा-या राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्थेला मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयक मिळालेले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

पंकज रोडेकर ठाणे : जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आहारपुरवठा करणा-या राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्थेला मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयक मिळालेले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ते १२ मार्च पूर्वी न मिळाल्यास संबंधित संस्थेने १२ मार्चपासून ठाणे, पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील रुग्णांना दिली जाणारी आहारसेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही अवस्था ठाणे, पालघर किंवा रायगड जिल्ह्यातील रुग्णालयाची नसून ती राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, निधी उपलब्ध होत नसल्याने हे देयक देण्यास उशीर होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्य आरोग्य भवनामार्फत गतवर्षी राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना आहारपुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. यावेळी ३० संस्थांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यातील ६ नागरी सेवा सहकारी संस्थांना राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आहारपुरवठा करण्याबाबत ठेका हा दर निश्चित करून दिला आहे. त्यातचएका संस्थेला चार ते पाच जिल्ह्यांतील रुग्णालयांना आहारपुरवठा करण्याचा ठेका दिला आहे. या संस्थात्यात्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना नियमित आहारपुरवठा करीत आहेत. मात्र, जून २०१९ पासूनते फेब्रुवारी २०२० या नऊ महिन्यांपासून आहारपुरवठा संस्थांना देयकमिळाले नाही. त्यामुळे किराणा, दूधव भाजीपाला या व्यापाऱ्यांचेदेणे बाकी असल्यामुळे पुरवठा केव्हाही बंद होऊ शकतो. तसेच देयकाची रक्कम १२ मार्चपूर्वी न मिळाल्यावर रुग्णालयातील आहारपुरवठाबंद करण्यात येईल, असा इशारा संस्थेने उपसंचालक आरोग्यसेवामुंबई मंडळ, ठाणे आणिजिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय यांना निवेदनाद्वारेदिला आहे.>काय मिळते रुग्णांनारुग्णालयात दाखल होणाºया एका रुग्णाला दिवसातून सकाळी नाश्ता, चहा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा आणि शेंगदाण्याचा लाडू तसेच रात्रीचे जेवण असा आहार दिला जातो. यासाठी ठेकेदाराला एक रुग्णाच्या मागे ११० रुपये मिळतात. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत ७५० ते ८०० रुग्ण असून त्यांच्यासाठी राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थाही आहार पुरविण्याचे काम करीत असून त्या संस्थेला नऊ महिन्यांपासून ६७ लाख ४६ हजार २५२ रुपये इतके देयक मिळलेले नाही.>निधी उपलब्ध नसल्याने मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयकाची रक्कम मिळालेली नाही. गेल्या वर्षी अशा प्रकारे पाच महिन्यांनंतर देयक मिळाले होते. त्यातच नऊ महिन्यांचे देयक मिळावे, यासाठी सोमवारी काही संस्थांच्या अध्यक्षांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ते लवकरच मिळेल, असे आश्वासन दिले आहे.- जनार्दन चांदणे, अध्यक्ष, राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्था मर्यादित, ठाणे व पालघर>आहार देयकांबाबत आरोग्य विभागाला लेखी माहिती दिली आहे. हे प्रकरण शासनस्तरावर आहे. तसेच संबंधित संस्थेने आहारसेवा बंद करू नये, असेही सांगितले आहे.- डॉ. गौरी राठोड, उपसंचालक,आरोग्यसेवा, मुंबई मंडळ, ठाणे