शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Thane: पावणेतीन लाखांच्या एमडी पावडरसह एकाला अटक; घरात सापडल्या तीन तलवारी आणि चॉपर

By अजित मांडके | Updated: July 13, 2023 15:22 IST

Thane: राबोडीत एका शाळेपासून ५० मीटर अंतरावर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दिपक उमाशंकर विश्वकर्मा (३२) याला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून पावणे तीन लाख रुपये किंमतीचा एकुण ५५.९७ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

- अजित मांडकेठाणे  - राबोडीत एका शाळेपासून ५० मीटर अंतरावर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दिपक उमाशंकर विश्वकर्मा (३२) याला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून पावणे तीन लाख रुपये किंमतीचा एकुण ५५.९७ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. तसेच राहत्या घरातून तीन तलवारी व एक चॉपर अशी धारदार शस्त्रे मिळून आली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राबोडी, ठाणे येथील सरस्वती हायस्कुल या शाळेपासून केवळ ५० मीटर अंतरावर काही इसम हे परराज्यातुन एमडी पावडर हा अंमली पदार्थ आणुन विक्रीकरीत असल्याची माहीती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्या पथकाने ०३ जुलै २०२३ रोजी राबोडी येथील कार वॉशिंग सेंटरचे पत्र्याचे शेड येथून दिपक विश्वकर्मा याला सापळा रचुन ताब्यात घेतले त्याच्याकडून एकुण ५५.९७ ग्रॅम एमडी पावडर या अंमली पदार्थासह तीन तलवारी व एक चॉपर अशी धारदार शस्त्रे हस्तगत केले.

त्याच्यासह त्याचा साथीदारांविरूद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २२ (क), २९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई अंमली ठाणे शहर पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उप निरीक्षक दिपेश किणी, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मोहन परब, पोलीस हवालदार विक्रांत पालांडे, हरीप तावडे, राजकुमार तरडे, शिवाजी वासरवाड, हुसेन तडवी,  महेश साबळे,  संदीप भांगरे,  हेमंत महाले,वैष्णावी परांजपे, पोलीस नाईक अनुप राक्षे, पोलीस शिपाई तेजल पाटीर यांनी केली आहे. 

चालू वर्षात १३ गुन्हे दाखल ; ३५ जण अटकठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने चालु वर्षात म्हणजे जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुध्द एकुण १३ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्याकडून एकूण ५४ लाख ८९ हजार ७५३ रुपये किंमतीचा अंमली पदार्थ तसेच एमडी हा अंमली पदार्थ बनविण्याकरीता लागणारे ९ लाख ५० हजार किंमतीचे साहीत्य जप्त केले आहे. तर याप्रकरणी ३५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी