Thane: रस्त्यावर सांडले ऑईल, दोन दुचाकीस्वार घसरून जखमी
By अजित मांडके | Updated: June 29, 2024 18:06 IST2024-06-29T18:04:41+5:302024-06-29T18:06:00+5:30
Thane: तीनहात नाका ते हरिनिवास सर्कलकडे येणा-या रस्त्यावर ऑईल सांडल्याची घटना सांयकाळी ४.१० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे येथून जात असतांना, दोन दुचाकीस्वार घसरून त्यांना दुखापत झाल्याची घटना घडली आहे.

Thane: रस्त्यावर सांडले ऑईल, दोन दुचाकीस्वार घसरून जखमी
- अजित मांडके
ठाणे - तीनहात नाका ते हरिनिवास सर्कलकडे येणा-या रस्त्यावर ऑईल सांडल्याची घटना सांयकाळी ४.१० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे येथून जात असतांना, दोन दुचाकीस्वार घसरून त्यांना दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर या रस्त्यावर माती टाकण्यात आली.
शनिवारी सांयकाळी ४.१० वाजताच्या सुमारास तिनहात नाका ते हरिनिवास सर्कल या ठिकाणी जाणा-या रस्त्यावर आॅईल सांडले होते. त्यामुळे येथून जाणारी वाहने घसरत असल्याचे दिसून आले. त्यात या ठिकाणाहून जाणारे पुरण सिंग (४०) रा. खारेगाव, ठाणे आणि एक ४१ वर्षीय डिसोझा नावाची महिला देखील यात जखमी झाली. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर या ठिकाणी माती टाकण्यात येऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.