शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Thane News: शिवसेनेने केली आपल्या सोय़ीची प्रभाग रचना, प्रशासनाचाही हातभार, ठामपा आयुक्तांची बदली करा, काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 15:36 IST

Thane News : सत्ताधारी शिवसेनेने आपल्या सोयीची प्रभार रचना केली असून यामध्ये पालिका प्रशासन देखील सामील असल्याचे आरोप काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

ठाणे  - ठाणे  महापालिकेच्या प्रभाग रचनेनवरुन उलट सुलट चर्चा सुरु असतांनाच ठाणो शहर कॉंग्रेसनेही देखील यावर गंभीर आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी शिवसेनेने  आपल्या सोयीची प्रभार रचना केली असून यामध्ये पालिका प्रशासन देखील सामील असल्याचे आरोप काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. प्रभाग रचनेच्या नकाशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यासाठी यापुढेही अशा प्रकारचे फेरफार होण्याची शक्यता असल्याने पालिका आयुक्तांची बदली करून या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला अधिकार न देता निवडणूक आयोगाने स्वतंत्न आयएएस अधिका-याची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

प्रभाग रचनेवर गंभीर आरोप करण्यात आले असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे हरकती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्येनुसार एससी वॉर्ड पडणार आहेत अशा ठिकाणी एससी वॉर्ड पडू नये अशी पप्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. प्रभाग रचना झिगझॅग करून गोलाकार करणे अपेक्षित असताना प्रभाग रचनेची पूर्णपणे मोडतोड तयार करण्यात आली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निवडणून येण्यासाठी तसेच सत्ता टिकवण्यासाठी नकाशामध्ये फेरफार करण्यात आले असून हा सर्व प्रकार पालिका आयुक्तांच्या देखरेकेखाली तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. यापुढेही मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याची शक्यता असून  यासाठी पालिका आयुक्तांचीच बदली करून या ठिकाणी निवडणूक आयोगाने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. २० प्रभागांची तोडमोड करण्यात आली असून या प्रभागांच्या रचनेवर आक्षेप असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

तर भाजपचे काम करू काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर आघाडीचे संकेत देण्यात आले असले तरी आघडी करायची कि नाही याबाबत स्थानिक नेतृत्वावर सोडले असल्याने  सन्मानपूर्वक जागा देण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. यासाठी आघडीत २५ ते ३० टक्के जागांची मागणी करण्यात आली असून पालिकेच्या महत्वाच्या समित्यांवर वर्णी लावण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. जर कॉग्रेसला सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या नाहीत तर भाजपचे काम करायला देखील कमी करणार नाही असा अजब इशारा देखील त्यांनी दिला.

सेनेच्या नगरसेवकांवरही निशाणाकाँग्रेस ३३ पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करणारा असून यामध्ये एसीसी आणि एन.टी उमेदवारांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. एससीच्या जागा निर्माण होऊ नये यासाठी प्रभाग रचनेची खेळी करण्यात आली असली तरी एससीचे उमेदवार शोधण्यासाठी इतर पक्षांची मात्र चांगलीच धावपळ होणार आहे. यावेळी त्यांनी सेनेच्या नगरसेवकांवर देखील निशाणा साधला आहे. सेनेच्या नगरसेवकांचे कर्तृत्व शून्य आहे अशांना तिकीट न देता त्या जागा आम्हाला द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना