ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा, ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:09 IST2018-01-30T17:05:32+5:302018-01-30T17:09:21+5:30

ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात आय टी वेध प्रबोधीनी या संस्थेमध्ये ७० लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. , ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण

Thane Municipal Workshop organized by the Social Development Department, 70 beneficiaries completed the training | ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा, ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण

ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा, ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण

ठळक मुद्देसमाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण शंकर पाटोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव

ठाणे: दीनदयाळ अन्तोदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने शहरातील गरीब होतकरू नागरिकांसाठी राबिवल्या जाणाऱ्या कौशल्या विकास  प्रशिक्षणांतर्गत आय टी वेध प्रबोधीनी या संस्थेमध्ये ७० लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

   सर्व प्रशिक्षणार्थीना सहाय्यक आयुक्त तथा समाज विकास अधिकारी शंकर पाटोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना रोजगार देण्यासाठी बँकिंग आणि अकॉटिंग क्षेत्रातील रोजगार देणाऱ्या सात कंपन्यातर्फे मुलाखत घेण्यात आल्या. एकूण १४० युवक –युवतींनी मुलाखती दिल्या त्यापैकी २६ प्रशिक्षणार्थीची अंतीम निवड करण्यात आली. ४० प्रशिक्षणार्थी प्राथमिक चाचणीत यशस्वी झाले. ठाणे महानगरपालिका ठाणे, दीनदयाळ अन्तोदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-  NULM) अंतर्गत ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १८ वर्षावरील महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , अल्पसंख्याक व सामाजिक आर्थिक जनगणना २०११ यादीतील  शहरी गरिबांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो.  सदर योजने अंतर्गत बँकिंग,रिटेल,सेक्युरिटी,इलेक्ट्रीशियन, टेलीकॉम, ऑटोमोबाईल,मेडीकल नर्सिंग आणि संगणक सेक्टरमधील विविध कोर्सचे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मान्यता प्राप्त संस्थेमार्फत दिले जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील समाज विकास विभाग, शहर अभियान व्यवस्थापक कक्ष ठाणे पाचपाखाडी येथे संपर्क साधवा असे आवाहन पालिकेच्यावतीने केले आहे. 

Web Title: Thane Municipal Workshop organized by the Social Development Department, 70 beneficiaries completed the training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.