शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता ठाण्यात भाजपला महापौर पद हवे...! मुंबईच्या दबावतंत्रावर डावखरेंनी डाव टाकला, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:25 IST

Shinde Sena vs BJP Thane municipal result news 2026: ठाणे महापौरपदावरून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी शिंदे सेनेला इशारा दिला आहे. २ वर्षांसाठी महापौरपद हवे, अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.

ठाणे: मुंबईतील महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगलेला असतानाच आता ठाण्यातही सत्तावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. "ठाणे महानगरपालिकेत भाजपला किमान दोन वर्षांसाठी महापौरपद मिळावे, अन्यथा आम्ही सत्तेत न राहता थेट विरोधी बाकावर बसू," असा खळबळजनक इशारा भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे. मुंबईतील राजकीय दबावतंत्राला उत्तर म्हणून डावखरेंनी ठाण्यात हा मोठा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठाण्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना निरंजन डावखरे म्हणाले की, "शीळ ते वडवली या पट्ट्यात भाजपने अत्यंत प्रभावी काम केले आहे. आम्हाला ज्या जागा वाट्याला आल्या, तिथे आम्ही १०० टक्के 'स्ट्राईक रेट' राखला आहे. आमची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ठाण्याचा महापौर भाजपचा असावा."

शिंदे सेनेसमोर पेच; ठाण्यात युती धोक्यात? सध्या ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे (शिंदे गट) बहुमत आहे. मात्र, सत्ता राखण्यासाठी भाजपची साथ महत्त्वाची आहे. "बहुमत त्यांच्याकडे असले तरी आमचा सन्मान झाला पाहिजे. दोन वर्षांसाठी महापौरपद हा आमचा हक्क आहे," असे म्हणत डावखरेंनी थेट विरोधात बसण्याची धमकी दिली आहे. यामुळे आगामी काळात ठाण्यातील 'युती'मध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईच्या राजकारणाचे पडसाद? मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू असताना, ठाण्यातही भाजपने आपला दावा ठोकून मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता शिंदे सेना यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Demands Thane Mayor Post, Threatens to Exit Alliance

Web Summary : BJP's Niranjan Davkhare demands Thane mayor post for two years, threatening to withdraw support from Shinde's Shiv Sena. This demand follows Mumbai's political developments, potentially straining the Thane alliance and increasing pressure on CM Shinde.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६Niranjan Davkhareनिरंजन डावखरेBJPभाजपा