शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

ठाणे : पालिकेच्या पार्किग प्लाझा रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपला, पुरेशा ऑक्सिजनची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 15:25 IST

ग्लोबल रुग्णालयावर ताण, व्होल्टास कोविड सेंटर ऑक्सिजन नसल्याने शुभारंभाच्या प्रतीक्षेत, ठाणे महापालिकेला पुरेशा ऑक्सिजनची गरज

ठळक मुद्देग्लोबल रुग्णालयावर ताण, व्होल्टास कोविड सेंटर ऑक्सिजन नसल्याने शुभारंभाच्या प्रतीक्षेतठाणे महापालिकेला पुरेशा ऑक्सिजनची गरज

ठाणे  :  ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा अखेर संपला असल्याचे महापालिकेने मान्य केले आहे. दरम्यान, पालिकेनं वेळीच त्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना अन्य ठिकाणी हलवलं आहे. परंतु आता पार्कीग प्लाझा येथील रुग्ण ग्लोबलला हलविण्यात आल्याने तेथेदेखील ताण वाढला आहे. तसेच येथील ऑक्सिजनची क्षमतादेखील कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने महापालिकेचे व्होल्टास येथील कोविड सेंटरही अद्यापही सुरु करण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने यात लक्ष घालून महापालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.ठाणे शहरात आतापर्यंत ९४ हजार २६ कोरोनाबाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतार्पयत ७७ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १४६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्याच्या घडीला १५ हजार १९७  रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे कोविड सेंटरदेखील आता अपुरे पडू लागले आहेत. अशातच पार्कीग प्लाझा कोविड सेंटर मधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आल्याने येथील २६ रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परंतु दुसरीकडे ग्लोबल रुग्णालयावरील ताण वाढला आहे. त्यातही रविवारी देखील पालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे पार्कीग प्लाझा येथील ऑक्सीजनचे बेड सुरु झालेले नाहीत. पालिकेने संबधींत कंपनीकडे मागणी करुनही पालिकेला आवश्यक त्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. 

त्यातही कल्याण डोंबिवली या भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथील रुग्ण देखील ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरकडे धाव घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरवरील ताण वाढू लागला आहे. परंतु आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकत नसल्याने ग्लोबल मधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयासाठी २० केएल  रोजच्या रोज ऑक्सिजनची गरज लागत आहे. तर पार्कीग प्लाझा येथे १३ आणि व्होल्टासला देखील १३ केएलची ऑक्सिजनची गरज रोजच्या रोज गरज लागत आहे. सध्या ग्लोबलाच २० केएल उपलब्ध असून रोजच्या रोज त्याचा वापर होत आहे. परंतु आता पार्कीग कोविड सेंटरला ऑक्सिजन न आल्याने येथील ऑक्सिजनचे बेड बंद करण्यात आले आहेत. तर व्होल्टास येथील कोवीड सेंटरलादेखील ऑक्सिजनची गरज असल्याने ते देखील सेंटर पालिकेला सुरु करता आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पालिकेने संबधित कंपनीला ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु तो अद्यापही मिळू शकलेला नाही. त्यातही सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आवश्यक तो पुरवठा न झाल्यास भविष्यात ऑक्सिजनचे बेड बंद करण्याची वेळ पालिकेवर येण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याची भीती पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस