शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

ठाणे महापालिकेचा ३०० कोटींचा ठेवा!

By admin | Updated: January 18, 2016 02:06 IST

मागील वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेचा आर्थिक डोलारा हा पुरता कोलमडलेला होता. ठेकेदारांच्या बिलांसह कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर निघतील अथवा नाही

ठाणे : मागील वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेचा आर्थिक डोलारा हा पुरता कोलमडलेला होता. ठेकेदारांच्या बिलांसह कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर निघतील अथवा नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली होती. परंतु, यंदा मात्र याच कालावधीत अतिरिक्त ३०० कोटींचे उत्पन्न मिळवून शिल्लक असलेल्या एलबीटीसह नगरविकास विभागाकडून आलेल्या घसघशीत महसुलाच्या बळावर ठाणे महापालिका प्रशासनाने दिवाळखोरीला बाजूला सारून आपली अर्थव्यवस्था भक्कम केली आहे. तसेच आता ही रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत ठेवली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून रु जू झाल्यानंतर संजीव जयस्वाल यांनी उत्पन्नवाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच आता उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत आहे. आता या वाढलेल्या महसुलाच्या जोरावर महापालिकेने आपली आर्थिक गणिते जमवितानाच ३०० कोटी रु पये मुदत ठेव म्हणून बँकेत ठेवले आहेत. राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना जकातीला पर्याय म्हणून राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी केली. सत्ताबदल होताच युती सरकारने ही कर पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिकांचे एलबीटीचे उत्पन्न सरासरी ६०० कोटी रु पये होते. एलबीटी बंद झाल्याने महापालिकांचे जमाखर्चाचे गणित कोलमडले होते. त्याला पर्याय म्हणून शहरात नोंदणी होणाऱ्या मालमत्तेच्या नोंदणीचा एक टक्का देण्याबरोबरच एलबीटी उत्पन्नाच्या काही प्रमाणात अनुदानही देण्याचे ठरविले. परंतु, त्यानंतरही अनेक महापालिकांना जमाखर्चाचे गणित जमविणे शक्य झाले नाही. अशीच अवस्था ठाणे महापालिकेची एक वर्षभरापूर्वी होती. तिजोरीत खडखडात असल्यामुळे शहरातील विकासकामेही खोळंबली होती.