शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्ती जिंदाबाद; ठाणे महापालिकेत पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणार 'नगरसेविका'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 09:44 IST

ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे  : ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या गॅजेटमध्ये पालिकेवर ७१ महिला आणि ७१ पुरुष उमेदवार निवडून जाणार आहेत; मात्र अनुसूचित जमाती(एसटी)च्या आरक्षणात तीन पैकी दोन जागा जर महिलांना गेल्या तर एक महिला अधिकची पालिकेवर जाण्याची शक्यता आहे; परंतु जर या ठिकाणी दोन पुरुषांचे आरक्षण पडले तर एक महिला पालिकेवर कमी जाणार आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, पुरुष सदस्यांच्या बरोबरीने महिला यावेळी सभागृहात दिसणार आहेत. 

ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. आता पालिकेने निवडणुकीचे पुढील गणित आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली. शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ आहे. महापालिकेवर १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रभागांची एकूण संख्या ४७ आहे. यातील ४६ प्रभाग हे तीन सदस्यांचे असून, एक प्रभाग हा चार सदस्यांचा असणार आहे. तीन सदस्यांच्या एका प्रभागाची लोकसंख्या ही किमान ३८ हजार ९०५ तर कमाल ४२ हजार ७९६ एवढी आहे. चार सदस्यांच्या एक प्रभागातील लोकसंख्या ५१ हजार ८७३ आहे. लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती (एससी) सर्वाधिक टक्केवारी असलेल्या १० प्रभागांमध्ये आरक्षण लागू केले जाणार आहे. अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४२ हजार ६९८ इतकी असून, त्यांच्यासाठी तीन प्रभाग राखीव असतील. त्यातले दोन महिलांसाठी ठेवले जाणार आहेत. २०११ च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीची (एससी) लोकसंख्या १ लाख २६ हजार होती. त्यांच्यासाठी १४२ पैकी १० जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. त्यापैकी पाच जागा या महिलांसाठी असतील. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रभागातील एससी मतदारांची संख्या जाहीर केली आहे.

प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाचा घोर

महापालिकेतील सत्तेत सहभागी होण्यासाठी ५० टक्के वाटा हा महिलांचा असणार आहे. मागील निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने दोन पुरुष आणि दोन महिला असे आरक्षण लागू होते. त्यामुळे अनेकांना संधी उपलब्ध झाली होती. आता पालिकेवर १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. परंतु तीन सदस्यीय पद्धत असल्याने तिकीट कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

प्रभाग रचनेत अनेक वॉर्डांची मोडतोड करण्यात आली आहे. वॉर्ड फोडल्याने काही विद्यमान नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तीन सदस्यीय पद्धत असल्याने दोन महिलांचे आरक्षण पडल्यास एका पुरुषाला माघार घ्यावी लागणार आहे. त्याला आपल्या पत्नीला रिंगणात उतरवावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या वॉर्डात एकाच महिलेचे आरक्षण पडो, अशी अनेकांची इच्छा आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक