शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

ठाणे महापालिकेने वसूल केला ४३९ कोटींचा मालमत्ताकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 10:33 IST

महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ताकर वसुलीसाठी यंदा ७४० कोटींचे वसुलीचं लक्ष्य दिले होते.

महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ताकर वसुलीसाठी यंदा ७४० कोटींचे वसुलीचं लक्ष्य दिले होते. त्यापैकी ४३९.२४ कोटी म्हणजे ५९ टक्के वसली आतापर्यंत झाली असून गेल्या वर्षांच्या तुलनेत ती १०५ कोटींनी जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. यावर्षी वसुलीसाठी मुख्यालयाकडून विशेष हातभार लागला आहे.

मुंब्रा आणि दिवा वगळता इतर प्रभाग समिती मार्फत त्यांना दिलेल्या लक्ष्याच्या तुलनेत ५७ ते ६२ टक्के वसुली झाली आहे. सर्वात जास्त लक्ष्य हे माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीला २००.४१ कोटींचे देण्यात  आले असून त्यांनी १२४.१३ कोटींची वसुली पूर्ण करून ठामपाच्या नऊ प्रभाग समितीमध्ये आघाडी घेतली आहे. यंदा मालमत्ता विभागाला ७४० कोटींचे वसुली लक्ष्य दिले होते. ते मार्चपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानुसार आखणी करून विविध उपाययोजना करून वसुली सुरू केली. वेळप्रसंगी कठोर पाऊलही उचलावे लागले. त्यामुळे ७ डिसेंबरपर्यंत दिलेल्या टार्गेटच्या ५९ टक्के वसुली करून चांगलीच झेप घेतली आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाच लाख ४३ हजार ५२० मालमत्ताधारक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख तीन हजार ३११ मालमत्ताधारक हे माजीवडा-मानपाडा या प्रभाग समितीअंतर्गत असून त्यानुसार त्यांना २००.४१ टक्क्यांचे टार्गेट दिले होते. त्यापाठोपाठ वर्तकनगर, नौपाडा-कोपरी या प्रभाग समिती असून त्या दोन्ही समितींना १०० कोटींच्यावर टार्गेट आहे. जसे माजीवडा-मानपाडानेही ६२ टक्के टार्गेट पूर्ण केले तसे नौपाडा-कोपरीने ६१ आणि वर्तकनगरने ५९ टक्के टार्गेट पूर्ण करून हातभार लावला. दिलेल्या टार्गेटपेक्षा सर्वात कमी वसुली ही दिवा येथून १३.२६ कोटी झाली असून त्यापाठोपाठ मुंब्र्यातून १७.५५ कोटी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गेल्या वर्षी या दिवशी ३३४.१२ कोटींची वसुली झाली होती. यंदा ती ४३९.२४ कोटींवर गेली असून, आकडा १०५.१२ कोटींनी जास्त आहे. येत्या चार महिन्यात टार्गेट पूर्ण करण्याचा दृष्टीने प्रयत्न सुरू असून जास्तीत जास्त वसुली करण्याचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका