शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

Thane Corona Update: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका सज्ज! १० कोटींची औषध खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 17:53 IST

ठाण्यात कोरोनाची दुसरा लाट ओसरत असतांना आतापासूनच ठाणो महापालिकेने तिस:या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

ठाण्यात कोरोनाची दुसरा लाट ओसरत असतांना आतापासूनच ठाणो महापालिकेने तिस:या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने या तिस:या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून १० कोटींच्या औषधांची खरेदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामाध्यमातून पालिकेने ३५० प्रकारच्या औषधांची खरेदी केली असून कोरोनाबरोबच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या  आजारांवर ही औषधे उपयुक्त ठरणार आहेत. दुसरीकडे तिसऱ्या लाटेमध्ये  मुलांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यानुसार व्हॅन्टीलेटरची खरेदी करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.कोरोनाची पहिली लाट थोपवल्यानंतर दुस:या लाटेचा सामना करताना प्रशासनाची पूर्णपणो दमछाक झाली. गेल्या काही दिवसांत रु ग्णसंख्या कमी होतांना दिसत असल्याने काही प्रमाणात का होईना ठाणोकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता यापुढे संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती देखील तज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने प्रशासनाने या लाटेचा सामना करण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरु  केली आहे. कोवीडच्या तिस:या लाटेत लहान मुलांना लागण होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्नातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. त्यामुळे पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी १०० बेडचे सेंटर सज्ज करण्यात आले आहे. इथे ५० आयसीयू आणि ५० जनरल बेड असतील. लहान मुलांना वेगळे व्हेंटिलेटर्स लागतात. त्यांची खरेदीसुद्धा पालिकेने केली आहे.  तसेच, संभाव्य कोरोनाग्रस्त मुलांवरील उपचारांसाठी लागणा:या औषधांची माहिती राज्य सरकारच्या टास्क फोर्सने उपलब्ध करून दिली आहे. त्या औषधांची खरेदी करण्याची प्रक्रि याही पालिकेने सुरू केली आहे. तिसरी लाट व पावसाळ्यातील रोगराईचा मुकाबला करण्यासाठी ३५० प्रकारची  सुमारे १० कोटी रु पये किमतीची औषधखरेदी पालिकेने केली आहे. तसेच, ४ कोटी रु पये किमतीची सर्जीकल सामग्रीसुद्धा खरेदी करण्यात आली आहे.  

ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ग्लोबल, पार्कीग प्लाझा, कौसा व खारीगाव येथील कोविड सेंटर्स कार्यरत होती. आता व्होल्टास आणि बुश कंपनी येथील कोविड सेंटर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. तिस:या लाटेचा मुकाबला करण्यासाठी पालिकेने ग्लोबल व पार्कीग प्लाझा कोविड सेंटरपाठोपाठ व्होल्टास येथील केंद्रावरही ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लाण्ट उभारला आहे. कोवीड सेंटर्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, लहान मुलांसाठी १०० बेडचे कोविड सेंटर, पुढील चार महिने पुरतील एवढा औषध साठा, सर्जीकल उपकरणो, रेमडेसिवीर अशी, सर्वच आघाड्यांवरील अत्यावश्यक सामग्री पालिकेने खरेदी केल्याची माहिती ठाणो महापालिकेने दिली आहे. त्यानुसार येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच तयारी केल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस