शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ठाण्यातील मो. कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वषार्निमित्त माजी विद्यार्थी - शिक्षकांचा आनंद मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 3:19 PM

मो. कृ नाखवा हायस्कूलच्या माजी विद्यार्थी - शिक्षकांचा अनोखा संगम येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे मो. कृ. नाखवा हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्ष ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ या शिर्षकाखाली कार्यक्रमशाळेतील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद मेळावा

ठाणे: मोतिराम कृष्णाजी नाखवा हायस्कूल, ठाणे माध्यमिक या शाळेतील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद मेळावा रंगणार आहे. निमित्त आहे ते शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ या शिर्षकाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.         मो. कृ. नाखवा हायस्कूल या विद्यालयाच्या स्थापनेस ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रविवार १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ७ यावेळेत नाखवा हायस्कूलच्या सभागृहात माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांच्या आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी, मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी व शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. १९६७ पासून ‘मागेल त्याला शिक्षण’ या ब्रीद वाक्याला अनुसरून कोपरी कॉलनी, कोपरी गाव, चेंदणी कोळीवाडा, आनंदनगर, पारशीवाडी, धोबीघाट, सिद्धार्थनगर, शांतीनगर, विजयनगर, कळवा, खारीगांव, दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, पार्क साईट या ठिकाणाहून येणाºया विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविण्याचे काम अविरतपणे नाखवा विद्यालयाने केले आहे. मागील वर्षात शाळेने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत विद्यार्थी दिले आहेत. असे विद्यार्थी घडविणारे शिक्षकही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात शाळेचे एकच ध्येय आहे की, आतापर्यंत बाहेर पडलेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना हाक देणे, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’. पुन्हा एकदा आपले जुने सवंगडी, शिक्षक यांना भेटणे. एकमेकांचे कुशलक्षेम विचारणे. आपण समाजातील काही देणे लागतो. आपण शिकलो पण येणाºया पिढीसाठी काही करता येईल का? म्हणून या रविवारचा आनंदमेळा आयोजित केला असल्याचे विद्यालयातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाcultureसांस्कृतिक