शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये २० हजार स्पर्धक, २ सप्टेंबरला रंगणार थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 3:12 AM

२९ वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे - २९ वी ठाणेमहापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी सात लाख दोन हजारांची बक्षिसे ठेवली आहेत.महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून ११ गटांत ती घेण्यात येणार आहे. पहिल्या तीन गटातील स्पर्धा राज्यस्तरावर असून पुरुष २१ किमी स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक रु . ७५ हजार, द्वितीय ४५ हजार आणि तृतीय ३० हजार आणि चौथ्या क्रमांकासाठी १५ हजारांचे पारितोषिक असणार आहे. त्याशिवाय ५ ते १० पर्यंतच्या विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.महिलांसाठीची स्पर्धा १५ किमीची असणार असून यामध्ये प्रथम पारितोषिक ५० हजार, द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजार आणि चौथे १५ हजार अशी असून ५ ते १० पर्यंतच्या विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा या ठिकाणी समाप्त होणार आहेत.१८ वर्षांवरील मुले (खुला गट) ही १० किमी असणार असून ही स्पर्धा पारसिकनगर ९० फूट रोड, खारेगाव येथून सुरू होणार असून महापालिका भवन चौक येथे समाप्त होणार आहेत. चौथा गट १८ वर्षांखालील मुले १० किमी ही जिल्हास्तरीय स्पर्धा असून ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून मिलेनियम टोयाटो शोरूम, वागळे इस्टेट येथे समाप्त होणार आहे.ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या सर्व स्पर्धांची सुरुवात महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी पाच किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक, उथळसर येथे समाप्त होणार आहे. १२ वर्षांखालील मुलामुलींसाठी तीन किमीची स्पर्धा असून ही स्पर्धा महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे.या स्पर्धेसाठी एकूण २३८ पंच, ९२ पायलट, शेकडो स्वयंसेवक, सुरक्षारक्षक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेदरम्यान स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, स्पर्धेच्या मार्गावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रु ग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.याशिवाय मॅरेथॉन स्पर्धकांसाठी ठाणे परिवहनसेवेतर्फे मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी सदर जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.ज्येष्ठ नागरिक महिला वपुरुष वेगळा गटठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित ज्येष्ठ नागरिक ६० वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी वेगळा गट असून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत. महापालिका ते बाटा शोरूम (नितीन कंपनी) अशी अर्धा किमीची ही स्पर्धा असणार आहे.अवयवदानासाठी जनजागृतीयंदाही ही दोन किमीची जिल्हास्तरीय ‘रन फॉर फ्री प्लास्टिक ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून येथेच समाप्त होणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ज्युपिटररु ग्णालयाचे डॉक्टरही सहभागी होणारआहेत.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनthaneठाणेMayorमहापौर