देशव्यापी बंदसाठी ठाण्यातील बाजार पेठ शुक्रवारी बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:53 IST2021-02-22T18:53:34+5:302021-02-22T18:53:52+5:30

व्यापारी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट)च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 26 फेब्रुवारीला देशव्यापी बंद पुकारणार आहे.

thane market going to protest against central government | देशव्यापी बंदसाठी ठाण्यातील बाजार पेठ शुक्रवारी बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

देशव्यापी बंदसाठी ठाण्यातील बाजार पेठ शुक्रवारी बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

केंद्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा करात जाचक अटी व तरतुदी लागू केल्या आहेत. त्याविरोधात व्यापारी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट)च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 26 फेब्रुवारीला देशव्यापी बंद पुकारणार आहे. त्यात सहभागी होऊन जिल्हह्यातही ठिकठिकाणची बाजार पेठ बंद ठेवण्याचा इशारा; ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या भेटी दरम्यान कॅटच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी दिला.

केंद्रीय अर्थसंकल्पात वस्तू सेवा करात जाचक अटीशर्ती लागू करण्याचा निर्ण य केंद्र शासनाने घेतला आहे. त्याविरोधात व्यापा:यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यास विरोध करून या जाचक अटीशर्ती मागे घेण्यासाठी व्यापारी देशव्यापी बंद पुकारणार आहे. या व्यापा:यांचे नेतृत्व कॅटव्दारे केले जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी कॅटचे प्रदेश उपाध्यक्ष  आणि ठाणो जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली बाजार पेठ बंद ठेवणार आहे. त्यास अनुसरून ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, यांना भेटलेल्या शिष्टमंडळाहने पंतप्रधानांच्या नावे निवेदन देऊन बाजार पेठ बंद ठेवण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. या शिष्टमंडळात शंकर ठक्कर, आमरसी कारिया, उदय ठक्कर, केशव पांडे आदी व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: thane market going to protest against central government

टॅग्स :thaneठाणे