पुण्यातील संमेलनात ठाणेकर कवींची बाजी
By Admin | Updated: June 29, 2017 02:48 IST2017-06-29T02:48:36+5:302017-06-29T02:48:36+5:30
एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली.

पुण्यातील संमेलनात ठाणेकर कवींची बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली. त्यांना कालिदास पुरस्कार देण्यात आला.
महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थेतर्फेआठव्या वर्धापन दिनानिमित्त कालिदास यांच्या वाङ्मयावर आधारित एकदिवसीय संमेलन संपन्न झाले. या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवी आणि लेखकांनी कालिदासांच्या साहित्यावर आधारित निबंधांचे वाचन केले. तसेच निवडक ३५ कवींनी कविता सादर केल्या.
यामध्ये ठाण्यातील ४ कवींचा समावेश होता. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ कवी जयंत भावे यांनी आपल्या ‘देव देवळातून बाहेर आला’ या कवितेतून देव दगडात नसतो, तर तो माणसांत असतो आणि माणसांतच राहतो.
जातीपाती न मानता अनेक संतांच्या मदतीला देव धावून आला आणि संत म्हणून त्यानेच जनसेवाही केली, असा आशय मांडला. तर, ‘यौवनाच्या पैलतीरावरचा’ या कवितेत कवी रूपेश पवार यांनी पावसाचा आनंद घेणाऱ्या तरु णीला, भरपावसात जाणवणाऱ्या आभासी प्रियकराचे वर्णन केले.
कवयित्री रेशमा मेहता यांनी ‘रेशमी धुके’ या कवितेतून सख्याच्या आतुर ओढीतून निर्माण झालेली प्रेमाची उत्कट भावना मांडली तसेच ललित निबंधातून क ालिदासाचे काव्यभाव व्यक्त केले.