ठाणे- मुंबई परिसरात मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 11:26 PM2021-01-25T23:26:09+5:302021-01-25T23:35:31+5:30

ठाणे- मुंबईतील कळवा आणि शीव परिसरात मोटार सायकल चोरी करणाºया फुरखान मोहम्मद इम्रान अरब (२०, रा. शीव, धारावी, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी दिली.

Thane: A man was arrested for stealing a motorcycle in Mumbai area | ठाणे- मुंबई परिसरात मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक

तीन मोटारसायकली हस्तगत

Next
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईतीन मोटारसायकली हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे- मुंबईतील कळवा आणि शीव परिसरात मोटार सायकल चोरी करणाºया फुरखान मोहम्मद इम्रान अरब (२०, रा. शीव, धारावी, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून चोरीतील तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे घडल्यामुळे या मोटारसायकल चोरटयांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने वागळे इस्टेट युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार सायकल चोरी करणारा फुरखान अरब याला कळवा भागातील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात १५ जानेवारी रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याने कळवा आणि शीव (सायन) भागातून चोरलेल्या एक लाख ५० हजारांच्या तीन स्कूटर हस्तगत केल्या आहेत. यातील एक स्कूटर ठाण्यातील कळवा भागातून तर दोन स्कूटर सायन भागातून चोरल्याचे त्याने सांगितले. पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, भूषण शिंदे आणि प्रषांत पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Thane: A man was arrested for stealing a motorcycle in Mumbai area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.