शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Thane: ठाण्यात भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरू केला प्रचार, पण चिन्ह कमळ की धनुष्यबाण? 

By धीरज परब | Updated: April 8, 2024 07:58 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघावरून (Thane Lok Sabha Constituency)  भाजपा आणि शिवसेनेत अजूनही खेचाखेची सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक (Sanjiv Nailk) यांनी भाईंदर मधून निवडणूक प्रचारास एकप्रकारे सुरवात करत पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शवल्याचे स्पष्ट केले आहे.

- धीरज परबमीरारोड - ठाणे लोकसभा मतदारसंघा वरून  भाजपा आणि शिवसेनेत अजूनही खेचाखेची सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक यांनी भाईंदर मधून निवडणूक प्रचारास एकप्रकारे सुरवात करत पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शवल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु चिन्ह हे शिवसेनेचे धनुष्यबाण सुद्धा असू शकते असे वक्तव्य सुद्धा त्यांनी केल्याने महायुतीचे नाईक हे उमेदवार असतील असे संकेत मिळत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच ठाणे लोकसभा मतदारसंघातील आहेत. परंतु  ठाण्या वरून भाजप व शिवसेना शिंदे गटात घोडे अडले असून शिवसेना शिंदे गटाची प्रतिष्ठा ठाणे लोकसभा मतदार संघा वरून लागली आहे.  हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला की भाजपच्या वाट्याला येणार हेच अजून निश्चित नाही. आमदार प्रताप सरनाईक हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याने मविआ चे राजन विचारे यांच्या समोर तगडा उमेदवार देण्यासाठी संजीव नाईक यांच्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याने नाईक हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात.त्यातच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन राजन विचारे हे दोन वेळा खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. यंदा शिवसेना ठाकरे गटाचे चिन्ह मशाल आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण चिन्ह वरून लढल्यास त्याचा फायदा देखील नाईक यांना होणार अशी अटकळ असू शकते.

शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक , ठाण्याचे  माजी महापौर  नरेश म्हस्के हे इच्छुक असून ओवळा माजिवडा विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे . भाजपकडून या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे नाव मध्यंतरी चर्चेत होते. डॉ. सहस्त्रबुद्धे हे सक्रिय सुद्धा झाले होते.  परंतु गेल्या काही महिन्यापासून डॉ. सहस्त्रबुद्धे यांचे नाव मागे पडले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना खासदार म्हणून निवडून आलेले आणि सध्या भाजपात असलेले संजीव नाईक हे आता उमेदवार म्हणून जोरदार प्रयत्नशील आहेत.

शिवसेना व भाजपने अजूनही ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे जाहीर केलेले नसले तरी भाजपा कडून संजीव नाईक यांनी भाईंदरच्या बालाजी नगर मधून त्यांच्या प्रचाराची एक प्रकारे सुरुवात रविवारी केली. बालाजी नगर मधील एका सभागृहात त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या सोबत बैठक घेतली . त्यात भाजपचे काही माजी नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.  त्यावेळी बोलताना स्वतः संजीव नाईक यांनी देखील पक्षाने आपल्याला उमेदवारीच्या अनुषंगाने करण्यास हिरवा कंदील दिला असून त्याची सुरवात आपण बालाजी नगर मधून करत आहोत . जवळपास ९९ टक्के आपली उमेदवारी निश्चित असून चिन्ह हे कमळ की  धनुष्यबाण असेल हे आपणास माहित नाही.  परंतु आपली तीव्र इच्छा ही कमळाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवण्याची आहे.  परंतु पक्षश्रेष्ठी जो काय निर्णय घेतील त्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत. 

नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचा दावा हा बळकट केल्याचे देखील मानले जात होते.  तर संजीव नाईक हे भाजपाचे जरी असले तरी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून देखील ते निवडणूक लढण्याची शक्यता सुद्धा बळावली आहे. त्यामुळे शिवसेने कडून ठाणे लोकसभा मतदारसंघा साठी महायुतीचे उमेदवार म्हणून संजीव नाईक यांच्या नावाची घोषणा करण्याचा दबाव वाढवण्याची शक्यता आहे.  एकूणच शिवसेना शिंदे गटाने पारंपारिक शिवसेनेचा गड असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडल्यास किंवा शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचे नाईक यांची उमेदवारी निश्चित केल्यास राजकिय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :thane-pcठाणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना