ठाणे: जेलमध्ये टाकण्याची धमकी देत राबोडीतील शफी काझी (७१) या जेष्ठ नागरिकाला त्याच्या स्वत:च्या जागेत बांधकाम करण्यास अडथळा करणा-या इसाक खान (रा. कोळीवाडा, राबोडी) यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते काझी यांना धमकावत असल्याचा आरोप आहे.राबोडीतील कोळीवाडा, जुम्मा मस्जिद भागात काझी यांच्या मालकीचा रुम आहे. विरेंद्रकुमार या गवंडीच्या मदतीने त्यांनी आपल्या घराच्या दुरुस्तीचे काम २७ आॅक्टोबर २०१७ रोजी सुरु केले होते. मात्र, काझी यांना कोळीवाडयातील मॉडर्न सोसायटीमधील रहिवाशी इसाक खान याने जेलमध्ये टाकण्याची धमकी देत हे काम त्याच दिवशी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास थांबविले. शिवाय, या जागेत कोणतेही काम करु नये असेही त्यांना बजावले. हा प्रकार धाक दडपशाहीने वारंवार सुरु राहिल्याने काझी यांनी अखेर कंटाळून याप्रकरणी १८ जानेवारी रोजी राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.‘‘ शफी काझी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. काझी आणि इसाक खान या दोघांमध्ये गेल्या बºयाच दिवसांमध्ये वाद सुरु आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. तथ्यता पाहून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’’रामराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राबोडी.
ठाण्याच्या राबोडीतील घटना: जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन बांधकामाला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:43 IST
राबोडीतील जेष्ठ नागरिक तथा बांधकाम व्यावसायिक यांच्या बांधकामात अडथळा आणल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्याच्या राबोडीतील घटना: जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन बांधकामाला अडथळा
ठळक मुद्दे राबोडीतील जेष्ठ नागरिकाची तक्रारगेल्या अनेक दिवसांचा वाद