शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील घटना: तरुणीच्या असभ्य वर्तनामुळे अभिनेत्री जुई गडकरीला मनस्ताप

By जितेंद्र कालेकर | Updated: August 2, 2018 22:11 IST

ठाण्यातील एका तरुणीने अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केल्याने अभिनेत्री जुई गडकरी हिने मनस्ताप व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी फेसबुकवर पोस्ट टाकून तिने आपली ही उद्विग्नता स्पष्ट केली.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्यक्त केली उद्विग्नताकार चालकासह जुईलाही शिवीगाळबाळकूमजवळील प्रकार

ठाणे : बाळकुम भागातील एका तरुणीने अत्यंत हीन शब्दांत शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केल्याने अभिनेत्री जुई गडकरी हिने मनस्ताप व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी फेसबुकवर पोस्ट टाकून तिने आपली उद्विग्नता व्यक्त केली.देवाचे माझ्यावर इतके प्रेम आहे की, त्याने मला सगळेच अनुभव द्यायचे असे ठरवले, अशी सुरुवात केलेल्या या पोस्टमध्ये जुईने ठाण्यातील हा अनुभव कथन केला आहे. एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे असल्यामुळे तिने एक टॅक्सी केली. त्याचवेळी बाळकुम भागातून २२ ते २५ वयोगटांतील एक तरुणी तिच्या आईसह तिच्या टॅक्सीजवळून स्कूटरवरून गेली. तिचा तोल गेल्याने ती टॅक्सीच्या अगदी जवळ आली आणि नंतर ती थोडी दूर गेली. त्याचवेळी अवघ्या काही वेळातच तिने अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विनाहेल्मेट असलेल्या या तरुणीने नाहक या टॅक्सीचालकाला शिवीगाळ केली. पुढे उड्डाणपुलाकडे तिची गाडी आल्यानंतर तिने जुईच्या टॅक्सीला तिची स्कूटर आडवी लावली. त्यावेळी तिच्या आईने या कारचालकाच्या श्रीमुखात लगावली. तिथे तिची मुलगीही आली आणि तिने पुन्हा शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. तेव्हा अर्जंट जायचे असल्यामुळे तुम्ही गाडी सोडा, अशी जुईने विनवणी केली. त्यावर तू गप्प बस नाही, तर तुलाही कानाखाली लावीन, असा दम द्यायलाही या तरुणीने मागेपुढे पाहिले नाही. ही कुठली भाषा, असा सवाल तिने केल्यानंतर आपण आगरी असल्याचा दावा तिने केल्याचे जुईने म्हटले आहे. नंतर, टॅक्सीचालक चुकला असेल, तूही विनाहेल्मेट आहेस, वगैरे सांगण्याचा जुईने प्रयत्न केला. बऱ्याच बाचाबाचीनंतर तिची गाडी सोडण्यात आली. जाताना आईने सुनावले की, आम्हाला ठोकले असते तर...मुळात स्वत:ची चूक असताना दुस-याला शिवीगाळ करणे, शिवाय आपला यात थेट संबंध नसतानाही या मुलीने आपला नाहक उद्धार करणे, याबद्दल तिने उद्विग्नता व्यक्त केली. आपल्या जीवाची इतकीच पर्वा होती, तर तिनेही हेल्मेट घालणे आवश्यक होते, असेही यात तिने सुचवले आहे. याप्रकरणी कोठेही तक्रार दाखल नसल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाAccidentअपघात